---Advertisement---
गुन्हे भुसावळ

ट्रकचे चाक अचानक निघाल्याने साकेगावजवळ तरुणाचा मृत्यू

accdint sakegaon
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ मे २०२१ । धावत्या ट्रकचे चाक अचानक निखळून समोरून येत असलेल्‍या दुचाकीला जोरदार धडकल्याने दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना आज रविवारी दुपारी महामार्गावरील साकेवागाव नजीक घडलीय. बादल गोकुळ पवार (रा. साकेगाव, ता.भुसावळ) असे या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

accdint sakegaon

याबाबत असे की, राष्ट्रीय महामार्गावरील साकेगाव जवळ भुसावळकडून जळगावकडे येणाऱ्या सिमेंटच्या ट्रक (एमएच १५ एफव्ही ९९९४) चे मागचे टायर अचानक निखळले. यावेळी  साकेगाव येथील बादल गोकुळ पवार हा दुचाकीने साकेगावकडून भुसावळकडे जात असतनांना त्याच्या दुचाकीवर अचानक चाक येवून धडकले.

---Advertisement---

अचानक घडलेल्‍या या प्रकारामुळे तरूणाला देखील गाडीवर नियंत्रण मिळविता आले नाही. ट्रकचे चाक धडकल्‍याने तरूण गंभीर जखमी झाला होता. यानंतर त्‍यास जखमी अवस्‍थेत तातडीने खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरु असताना काही वेळातच त्याचे निधन झाले.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---