⁠ 
शुक्रवार, डिसेंबर 13, 2024
Home | जळगाव जिल्हा | रावेर | अ. नी. स. गु. शास्त्री वासुदेव चरण दासजी यांना सावदा येथे श्रद्धांजली

अ. नी. स. गु. शास्त्री वासुदेव चरण दासजी यांना सावदा येथे श्रद्धांजली

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ एप्रिल २०२२ । सावदा स्वामींनारायण मंदिराचे माजी कोठारी तथा यावल येथील स्वामींनारायण मंदिराचे निर्माण करते अ. नि. स. गु. शास्त्री वासुदेवचरणदासजी यांचे नुकतेच बडोदा (गुजरात) येथे निधन झाले, त्यांना सावदा येथील स्वामींनारायण मंदिरात दि 23 रोजी सायंकाळी 8 वाजे दरम्यान एक श्रद्धांजली सभा घेऊन समस्त सावदावासीय हरिभक्ता तर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली.

याप्रसंगी सावदा मंदिराचे विद्यमान कोठारी शास्त्री राजेंद्रप्रसाददासजी यांनी अ. नी. स. गु. शास्त्री वासुदेव चरण दासजी यांचे जीवन कार्यात त्यांनी स्वामीनारायण संप्रदाया साठी केलेल्या विविध कामाचा तसेच धर्मप्रसार व सामाजिक कार्या हे कसे होते या बाबत माहिती सांगितली तर सावदा मंदिराचे जनरल मुख्यत्यार चंद्रशेखर पाटील यांनी देखील यावेळी आपले विचार मांडताना शास्त्री वासुदेवचरणदासजी यांनी केलेल्या कार्याचा आढावा मांडला.

यावेळी स.गु. शास्त्री शास्त्री धर्मप्रसाददासजी, स.गु. शास्त्री राजेंद्रप्रसाददासजी, शास्त्री मोहन स्वामी, शास्त्री मुक्तदर्शन स्वामी, जनरल मुख्यट्यार चंद्रशेखर पाटील, दिपक भगत, शरद भगत, डॉ अजीतकुमार पाटील, शिवाजी भारंबे, नंदू पाटील सर, प्रमोद चौधरी, यांचे सह हरिभक्त उपस्थित होते.

यावेळी नंदू पाटील सर यांनी सूत्र संचालन केले, तर वडताल ट्रस्टी बोर्ड ने सावदा मंदिराचे नवीन ट्रस्टी म्हणून डॉ. अजितकुमार पाटील व शिवाजी भारंबे यांची नियुक्ती केल्याचे जाहीर करीत त्यांचे स्वागत देखील करण्यात आले

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.