जळगाव लाईव्ह न्यूज । १६ ऑगस्ट २०२१ । मोहराळा हरीपुरा ग्रुप ग्रामपंचायतच्या वतीने जागतिक आदीवासी क्रांतीदिनाचे औचित्य साधुन आदीवासी बांधवांच्या कब्रस्थान ( दफनभुमी ) च्या परिसरात विविध जातीच्या सुमारे एक हजार वृक्षांची लागवड करण्यात आली.

यावल तालुक्यातील मोहराळा हरीपुरा ग्रुप ग्रामपंचायतच्या माध्यमातुन आदीवासी तडवी बांधव समाज कब्रस्थान ( दफनभुमी ) च्या आवारात मनरेगाच्या वतीने विविध जातींचे सुमारे एक हजार वृक्षांचे वृक्षारोपण सरपंच नंदा गोपाळ महाजन यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी नव्याने रूजु झालेले ग्रामसेवक राजु महाजन, रोजगार सेवक व ग्राम पंचायत सदस्य यशवंत पाटील , ग्राम पंचायत सदस्य प्रमोद महाजन , भावना महाजन ,रिहाना तडवी , राजु तडवी ,रूखसाना तडवी , अनील अडकमोल, भरत महाजन , सुलेमान नहाळ ,सामाजीक कार्यकर्ते गोपाळ महाजन त्याचप्रमाणे ग्रामपंचायतचे कर्मचारी संजय महाराज व इतर कर्मचारी वृंद्ध आणी ग्रामस्थ मंडळी मोठया संख्येने उपस्थित होते . यावेळी ग्रामपंचायतच्या माध्यमातुन कब्रस्थान ( दफनभुमी ) च्या आवारात वृक्षरोपणाचे उत्कृष्ठअसे कार्यक्रम घेतल्या बद्दल संपुर्ण वृक्षांच्या देखरेखीची व संगोपणाची जबाबदारी घेवुन आदीवासी समाज बांधवांच्या वतीने मोहराळा ग्रामपंचायतच्या सरपंच व त्यांचे सर्व सहकार्यांचे आभार मानले .