व्याघ्र अधिवास क्षेत्रात वृक्ष तोडीसह अवैध वनचराई; प्रवेश निषेध क्षेत्रातही मानवी हस्तक्षेप बळावला
जळगाव लाईव्ह न्यूज । ३ ऑक्टोबर २०२४ । जिल्ह्यातील पट्टेदार वाघासाठी सुप्रसिद्ध असलेल्या मुक्ताईनगर तालुक्यातील वडोदा वनक्षेत्रात शेळ्या -मेंढ्यांच्या अवैध वनचराईचे प्रमाण वाढत असून शेळ्या – मेंढ्यांना चारा म्हणून अंजनाचे डेरेदार वृक्ष छाटण्याचे प्रमाण वाढत चालले आहे.यामुळे तृण भक्षक प्राण्यांना पुरेसं कुरण मिळणे दुरापास्त होत आहे. परिणामी वन्य प्राणी शेतीशिवाराची वाट धरताहेत व शेतीपिकांचे अतोनात नुकसान करीत आहे. मात्र शेतीपीक नुकसानीचे पंचनामे करून होत असलेल्या नुकसानीची भरपाई देणारा वनविभाग ठोस उपाय योजनेचा एक भाग असलेल्या अवैध वनचराई कडे मात्र सर्रास दुर्लक्ष होतांना दिसून येत आहे.यामुळे भविष्यात भयंकर दुष्परिणामांना सामोरे जावे लागणार यात शंका नाही.
विविध वनसंपदेने नटलेले जंगल आणि त्यात वाघासह विविध पशुचा कायमस्वरूपी वावर असल्यामुळे सदर क्षेत्रास टप्प्या टप्प्याने ‘राखीव वनसंवर्धन क्षेत्र’ दर्जा प्राप्त होऊन नंतर ‘आई मुक्ताई -भवानी अभयारण्य’ म्हणून घोषित झाले असून अंतिम मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. म प्र हद्दीतील मेंढपालांसह स्थानिकांकडून हजारो शेळ्या -मेंढ्या जंगलात चारल्या जात असून जंगलातील कुरण नष्ट करण्याबरोबरच पालेदार वृक्षाच्या फांदया तोडणं काही कोवडे झाडं तोडणे अशे प्रकार पाहवयास मिळताहेत.
काही ठिकाणी दिवसढवळ्या मोटार सायकली द्वारे थेट जंगलात अपप्रवेश करून अंजन वृक्षाच्या फांदया तोडून आणत आहे तरी वनविभाग कोणती कारवाई करण्यास तयार नाही.यांचबरोबर पाळीव प्राण्यांमंध्ये असलेले संसर्ग जन्य आजार वन्य प्राण्यांना जळण्याचा धोका संभवतो. व्याघ्र अधिवास क्षेत्र असल्याने मानवी प्रवेश निषीद्ध आहे याखेरीज परवानगी शिवाय जंगलात मोटार सायकलसह कुऱ्हाड,विडा वा अन्य काही धोकेदायक वस्तू घेऊन जंगलात प्रवेश करणे वन कायाद्या नुसार गंभीर स्वरूपाचा गुन्हा असतांना वनविभागाकडून कारवाया होत नसल्याची खंत वन्य प्रेमीकडून होत आहे.वनोअपराधांना वेळीच आळा घालण्याची गरज निर्माण झाली असून वनविभागाने लक्ष देण्याची आवश्यकता आहे.