जळगाव लाईव्ह न्यूज । १५ मार्च २०२२ । मुक्ताईनगर मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी मतदार संघातील रस्त्यांसाठी चालु वर्षीच्या अर्थसंकल्पात 41 कोटी रुपयांची तरदूत मंजूर करण्यात आली असून यामुळे मुक्ताईनगर मतदार संघातील रस्त्यांची अवस्था बदलणार आहे.

आतापर्यंत राज्य मार्ग, जिल्हा मार्ग यांचा बजेट तयार करून त्यावर अर्थसंकल्पातून तरतूद केली जात होती. यामुळे राज्य मार्ग असतील किंवा जिल्हा मार्ग असतील या रस्त्यांची दशा काही ऐंशी खराब झाल्यास ती लागलीच पालटली जात होती परंतु ग्रामीण मार्ग 3054 चे रस्ते यांच्यावर निधी उपलब्ध नसल्याने व कुठल्याही प्रकारे तरतुदी होत नसल्याने या रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली होती. यामुळे ग्रामस्थांना मोठा मनस्ताप होत होता. ही बाब लक्षात घेता महा विकास आघाडीच्या ठाकरे सरकारने यंदाच्या 2022 च्या अर्थसंकल्पामध्ये राज्य मार्ग असतील किंवा जिल्हा मार्ग असतील यासोबत अस्तित्व म्हणजे ग्रामीण मार्ग या बाबीवर महत्त्व दिले आहे. मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी विशेष पाठपुरावा करून मुक्ताईनगर मतदार संघातील राज्य मार्ग जिल्हा मार्ग व ग्रामीण रुपये मंजूर पिरार्ष पाठपुरावा करून मुक्ताईनगर मतदार संघातील राज्य मार्ग जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्गांसाठी सुमारे 41 कोटी रुपये मंजूर करून घेतले आहेत. लवकरच रस्त्यांच्या कामांना प्रशासकीय मान्यता निवेदित निविदा प्रक्रिया प्रशासकीय कामकाजाच्या सोपस्कार पार पाडून सुरुवात होणार असल्याची माहिती आमदार यांचे स्वीय सहाय्यक प्रवीण चौधरी यांनी दिली.








