जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्हा पोलीस दलात प्रशासकीय कारणास्तव मोठे फेरबदल करण्यात आले असून जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी गुरुवारी १७ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. या बदल्यांमध्ये २ पोलिस निरीक्षक, ८ सहाय्यक पोलिस निरीक्षक (API) आणि ७ पोलिस उपनिरीक्षक (PSI) यांचा समावेश आहे.

या आदेशानुसार कावेरी कमलाकर यांची जिल्हा विशेष शाखेत रिक्त पदावर नियुक्ती करण्यात आली असून प्रदीप ठाकूर यांच्याकडे सायबर पोलिस ठाण्याचा प्रभारी म्हणून कार्यभार सोपविण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक कार्यालयातील वाचक विशाल पाटील यांची सावदा पोलिस ठाण्याच्या प्रभारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

याशिवाय आर्थिक गुन्हे शाखेतील गणेश फड यांची सावदा पोलिस ठाण्यात, एमआयडीसी पोलिस ठाण्यातील माधुरी बोरसे यांची मानव संसाधन विभागात, अहिल्यानगर येथील विजय माळी यांची भुसावळ शहर पोलिस ठाण्यात, फोर्स वनमधील सुनील कदम यांची धरणगाव पोलिस ठाण्यात, भुसावळ येथील राहुल भंडारे यांची शहर वाहतूक शाखेच्या प्रभारीपदी, रामानंद नगरचे नीलेश राजपूत यांची एमआयडीसी पोलिस ठाण्यात, तर पाचोरा येथील प्रमोद वाघ यांची अडावद पोलिस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे.
उपनिरीक्षकांच्या बदल्याही जाहीर
पोलिस उपनिरीक्षकांच्या बदल्यांमध्ये एमआयडीसी पोलिस ठाण्यातील मो. अली सत्तार अली यांची भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात, भुसावळ बाजारपेठ येथील भारती काळे यांची चाळीसगाव ग्रामीण येथे, डायल ११२ मधील दीपक जगदाळे यांची स्थानिक गुन्हे शाखेत (एलसीबी), एलसीबीतील कृष्णा पाटील यांची एमआयडीसी पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.
तसेच अहिल्यानगरचे निवांत जाधव यांची भुसावळ बाजारपेठ येथे, एमआयडीसीचे संतोष पवार यांची धरणगाव पोलिस ठाण्यात, तर डायल ११२ मधील सुनील पाटील यांची अँटी टेररिझम ब्युरो (एटीबी) येथे नियुक्ती करण्यात आली आहे. या बदल्यांमुळे जिल्ह्यातील विविध पोलिस ठाणे व शाखांमधील प्रशासकीय कामकाजाला अधिक गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.







