जळगाव लाईव्ह न्यूज । ४ मार्च २०२४ । अमळनेर पोलिस ठाण्यात कार्यरत तीन कर्मचाऱ्यांची तीन वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांत तडकाफडकी बदली करण्यात आली असून याबाबतचे आदेश पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी काढले.
यात पोलिस हेडकॉन्स्टेबल शरद तुकाराम पाटील, पोलिस नाईक दीपक शांताराम माळी, रवींद्र अभिमन पाटील यांचा समावेश आहे. या कर्मचाऱ्यांविषयी वाढलेल्या तक्रारी, आपापसातील चढाओढीची माहिती पोलिस अधीक्षकांपर्यंत पोहोचली होती. त्याची गांभीर्याने दखल घेण्यात आली.
तिघा पोलिसांची तडकाफडकी बदलीचे आदेश पोलिस अधीक्षकांनी काढले. यात शरद पाटील यांची भडगाव पोलीस ठाण्यात तर दीपक माळी बोदवड पोलीस ठाण्यात, रवींद्र पाटील यांची बदली अडावद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
दरम्यान, अमळनेर येथील माजी नगरसेवक पुत्राच्या मृत्यूनंतर दाखल आकस्मिक मृत्यू प्रकरणाच्या चौकशीसाठी गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) वरील तीन जणांना बोलावले होते. त्यानुसार २६ फेब्रुवारीला त्यांची चौकशी झाली.