जळगाव लाईव्ह न्यूज । १७ नोव्हेंबर २०२३ । यावल तालुक्यातील हिंगोणा येथे अज्ञात माथेफिरूने शेतातील केळीचे खोड कापून फेकल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणत नुकसान झाले आहे.
हिंगोणा येथील शेतकरी भरत सुरेश नेहेते यांनी प्रमिला महाजन (गट क्रमांक ९६५) यांची शेती बटाईने केली आहे. ही शेती हिंगोणा गावापासून जवळच आहे. ते १६ रोजी सकाळी या शेतात गेले असता, त्यांच्या शेतातील शंभर ते दीडशे केळी खोडं अज्ञात माथेफिरूने कापून फेकल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
याचबोरबर याच रस्त्याने पुढे बोरखेडा गावालगत गजेंद्र राजपूत यांचे शेत असून, त्यांच्या शेतातील देखील शंभर ते दीडशे केळीची खोडं कापून फेकण्यात आली आहेत. हिंगोणा परिसरातील शेत शिवारामध्ये अशा घटना वेळोवेळी घडत आहे.
या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. हिंगोणा परिसरातील शेती शिवारामध्ये अशा घटना वेळोवेळी घडत आहे. शेतकऱ्यांच्या विहिरींच्या मोटार पंपाची केबल वायर चोरी करणे, स्टार्टर चोरी करणे, शेती पिकाच नुकसान करणे, पाईपलाईन तसेच ठिबक चोरी करणे अशा घटना वेळोवेळी घडत आहेत आणी अशा तक्रारी फैजपुर पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आल्या आहे. परंतु याबाबत अद्याप पर्यंत कुठलाही अज्ञात चोर पोलिसांच्या हाती लागला नाहीये. तरी माथेफिरुंचा शोध घेतला जात आहे.