प्रवाशांनो लक्ष द्या : या सहा रेल्वे गाड्या झाल्या आहेत रद्द

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ फेब्रुवारी २०२३ । नागपूर विभागातील गुमगाव स्थानकावर नॉन इंटरलॉकिंगचे काम करण्यात येणार असल्याने सहा रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. याचबरोबर दोन गाड्या शॉर्ट टर्मिनेट करण्यात आल्या आहेत.


यामुळे रेल्वे प्रवाशांची पुन्हा मोठी गैरसोय होणार आहे. गाडी क्रमांक 12120 अजनी-अमरावती एक्सप्रेस सोमवार, 13 रोजी रद्द करण्यात आली असून 12119 अमरावती-अजनी एक्सप्रेस मंगळवार, 14 रोजी रद्द करण्यात आली आहे.

01373 वर्धा-मगपूर-वर्धा मेमू रविवार, 12 रोजी रद्द करण्यात आली तसेच 01373 वर्धा-नागपूर व 01374 नागपूर-वर्धा मेमू सोमवार, 13 रोजी रद्द करण्यात आली आहे. दरम्यान, 12160 जबलपूर-अमरावती एक्सप्रेस रविवारी नागपूरपर्यंत चालवण्यात आली तर 12159 अमरावती-जबलपूर एक्सप्रेस सोमवारी नागपूर येथून सुटणार आहे.