---Advertisement---
गुन्हे यावल

डांभुर्णीत अवैध वाळु वाहतुक करणारे ट्रॅक्टर पकडले

dambhorni
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ मार्च २०२१ । यावल तालुक्यातील डांभुर्णी गावातून अवैध वाळुची वाहतुक करणारे ट्रॅक्टर महसुलच्या धडक मोहीमेत आज सकाळी पकडण्यात आले.  महसुल प्रशासनाने आठ दिवसात केलेल्या पाचव्या कारवाईमुळे विना परवाना वाळुची वाहतुक करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.

dambhorni

डांभुर्णी गावाजवळच्या नाल्यात साठवण करून ठेवलेल्या अवैधरित्या ट्रॅक्टर (क्रमांक एम.एच. १९ सीयु. ९८०२) ताब्यात घेतले आहे.  महसुल प्रशासनाच्या नायब तहसीलदार आर.के.पवार, फैजपुर मंडळातील तलाठी पी.पी.जावळे, आमोदे येथील तलाठी एम.पी. खुर्दा, पोलीस कर्मचारी भुषण चव्हाण. तहसीलदारांचे वाहन चालक हिरामण सावळे यांनी विनापरवाना वाळुची वाहतुक करतांना ताब्यात घेतले.

---Advertisement---

सदरच्या विनापरवाना वाळुची वाहतुक करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती निवासी नायब तहसीलदार पवार यांनी दिली. महसूलच्या वाळू माफीयाविरुद्ध सुरू केलेल्या मोहिमेअंतर्गत आठ दिवसातील पाचवी कारवाई झाल्याने वाळु माफीयावर चांगला वचक बसल्याचे दिसुन येत आहे. यावेळी महसुलच्या पथकाने घटनास्थळी जावून वाळुचा पंचनामा करून ट्रॅक्टर वाहन जमा केले आहे. दरम्यान वाळुची वाहतुक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकांने कारवाईच्या भितीने वाहन घेवुन पळुन जाण्याचा देखील प्रयत्न केला. मात्र महसुलचे वाहन चालक हिरामण साळवे यांनी समय सुचकता बाळगुन वाळुची वाहतुक करणाऱ्या ट्रॅक्टरचा अत्यंत खडतर मार्गावरून सुमारे पाच किलोमिटर पाठलाग करून वाहनास पकडण्यात यश मिळवले.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---