जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जुलै २०२२ । ट्रॅक्टर ट्रॉली चोरी करणाऱ्या संशयिताला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. इमरान उर्फ फुन्ना खान हयात खान (३२, रा. मिठी खाडी, आव्हाणे ता.जि.जळगाव ) असे अटकेतील संशयित आरपीचे नाव आहे.
शिरसोली प्र.बो. येथील निजामोद्दीन शमाशोद्दीन पिंजारी यांच्या ट्रॅक्टरची ट्रॉली दि. २४ जानेवारी २०२१ रोजीच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात पोलिसांनी सागर उर्फ गोल्या रमेश मोरे व आकाश ज्ञानेश्वर शिंदे (दोन्ही रा. आव्हाणे) याला यापुर्वी अटक करण्यात आली होती. पण, त्यांचा साथीदार इमरान उर्फ फुन्ना खान हयात खान हा मात्र फरार होता.
अखेर तो जळगाव शहरात आल्याची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे मुदस्सर काझी यांना आज बुधवारी २० जुलै रोजी दुपारी मिळाली. त्यानुसार पोलीस निरिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली अतुल वंजारी, मुदस्सर काझी, इम्रान सैय्यद, सुधीर साळवे, चंद्रकांत पाटील, सचिन पाटील आदींनी इमरान याला सापळा रचून अटक केली.