जळगाव लाईव्ह न्यूज । २६ मे २०२२ । भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथून ट्रॅक्टर लांबवणार्या जळगावातील दोघा आरोपींच्या जळगाव गुन्हे शाखेने पिंप्राळा परिसरातून अटक केली. त्यांच्या ताब्यातून चोरलेले ट्रॅक्टर जप्त करण्यात आले आहे. आकाश संजय पाटील, गणेश राजेंद्र शिंदे अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
जळगाव गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सुधाकर अंभोरे, नाईक विजय पाटील, राहुल पाटील, प्रीतम पाटील पंकज शिंदे आदींच्या पथकाने आरोपींच्या पिंप्राळा भागातून मुसक्या आवळल्या. पुढील कारवाईसाठी दोघांना वरणगाव पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.