गुन्हेजळगाव शहर

ट्रक्टरचे चाक अंगावरून गेल्याने ट्रक्टर चालक जागीच ठार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २ फेब्रुवारी २०२२ । जळगावातील आसोदा रेल्वेगेटजवळ आज दुपारी एक दुर्दैवी घटना घडलीय. ट्रॅक्टरचा ब्रेक फेल झाल्याने झालेल्या अपघातात ट्रॅक्टर चालकाचा चाकाखाली दबून मृत्यू झाल्याची घटना घडलीय. विठ्ठल यशवंत रायसिंग (कोळी) (वय-४५, रा. आसोदा ता.जि.जळगाव) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. याबाबत पोलीसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.

आसोदा येथील विठ्ठल रायसिंग हे ट्रक्टर चालक असून ट्रॅक्टर चालवून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात. आज बुधवार २ फेब्रुवारी रोजी विठ्ठल कोळी हे जळगावहून आसोदाकडे रिकामे ट्रॅक्टर घेवून जात होते. त्यावेळी आसोदा रेल्वे गेट बंद होते. ट्रॅक्टर थांबवून रेल्वे जाण्याची वाट बघत असतांना ट्रॅक्टरचा अचानक ब्रेक फेल झाल्याने त्यांचा ट्रक्टरवरील ताबा सुटला व ते खाली पडले.

तेवढ्यात ट्रक्टरचे चाक अंगावरून गेल्याने ट्रक्टर चालक विठ्ठल कोळी यांचा जागीच मृत्‍यू झाला. खासगी वाहनाने मृतदेह जिल्हा शासकीय विद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला आहे. मयताच्या पश्चात आई मिराबाई, पत्नी सरला, बबलू आणि जयवंत हे दोन मुले आणि विवाहित मुलगी दिपाली, सुन असा परिवार आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा पोलीसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.

हे देखील वाचा :

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button