⁠ 
बुधवार, जुलै 24, 2024

सिमी प्रकरणात भुसावळातून शिक्षकाला अटक ; दिल्ली पथकाची कारवाई, जिल्ह्यात खळबळ

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ फेब्रुवारी २०२४ । जिल्ह्यात खळबळ उडवून देणारी एक मोठी बातमी भुसावळमधून समोर आलीय. २२ वर्षांपासून फरार असलेल्या सिमी संघटनेच्या संशयिताला दिल्ली स्पेशल सेलच्या पोलिसांनी भुसावळ शहरातील मिल्लत नगर भागातून अटक केली आहे. हानिफ शेख मोहम्मद हानिफ, असे संशयित आरोपीचे नाव असून त्याच्याविरुद्ध २००१ मध्ये युएपीए कायद्या अंतर्गत दिल्ली पोलिसात गुन्हा दाखल आहे.

हानिफ शेख मोहम्मद हानिफ हा भुसावळात १३ वर्षांपासून खडका रोडवरील पालिकेच्या उर्दू हायस्कूलला शिक्षक म्हणून काम करत असल्याची माहिती समोर आलीय. तसेच त्यांनी काही वर्ष अमळनेर येथेही शिक्षक म्हणून नाेकरी केली. ते एका फाउंडेशनचे सचिवही आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली असून तपास सुरू आहे.

काय आहे प्रकरण?
संशयित हनिफ याने २००१ मध्ये प्रतिबंधित दहशतवादी संघटना ‘सिमी’चे निघणारे मासिक ‘इस्लामिक मुव्हमेंट’मध्ये प्रक्षोभक लिखाण केल्याच्या आरोपावरून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यात संशयित सातत्याने गैरहजर राहिल्याने दिल्ली न्यायालयाने संशयिताला २००२ मध्ये फरार घोषित केले हाेते. संशयित भुसावळात असल्याची गाेपनीय माहिती दिल्ली स्पेशल सेलच्या पोलिसांना मिळाली होती.

त्यानुसार दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने काल गुरुवारी दुपारी भुसावळमध्ये धडक दिली. पोलिसांनी गोपनीय माहिती तसेच तांत्रिक विश्लेषणावरून हानिफ शेख मोहम्मद हानिफ पत्ता शोधून काढला होता. त्यांनतर स्थानिक पोलिसांच्या मदतीने सापळा रचून मिल्लत नगरमधील राहत्या घरातून त्याला अटक करण्यात आली. या कारवाईने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.