⁠ 
गुरूवार, सप्टेंबर 19, 2024
Home | गुन्हे | माहेरहून नोकरीवर परमनंट करण्यासाठी पैसे आणावेत, या मागणीसाठी विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ

माहेरहून नोकरीवर परमनंट करण्यासाठी पैसे आणावेत, या मागणीसाठी विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज| १ ऑगस्ट २०२३। केवडीपुरा येथील माहेर असलेल्या विवाहितेला माहेरहून पैसे आणावेत या मागणीसाठी तिचा शारीरिक व मानसिक छळ केला जात होता. याप्रकरणी पतीसह सासरच्या मंडळीविरुद्ध एरंडोल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नोकरीवर कायम करण्यासाठी माहेरून पैसे आणावेत म्हणून विवाहितेचा छळ केला जात होता.

केवडीपुरा येथील माहेर असलेल्या दीक्षा शुभम सोनवणे वय १९ यांचा विवाह शुभम चंद्रकांत सोनवणे राहणार ठाणे यांच्याशी रितीरिवाज्यानुसार झाला होता. मात्र विवाह नंतर २९ डिसेंबर २०२२ ते १२ एप्रिल २०२३ च्या दरम्यान दीक्षा सोनवणे यांना तुझ्या माहेरहून नोकरीवर परमनंट करण्यासाठी पैसे आणावेत यासाठी वेळोवेळी तगादा लावला होता. पैसे न आणल्यास तुला नांदवणार नाही ,घरात घुसू देणार नाही, आणि तुला फारकत देऊन टाकू असे सांगून शारीरिक व मानसिक छळ करून त्यांनी मारहाण करीत धमकी दिली.

या प्रकरणी विवाहितेच्या फिर्यादीवरून पती शुभम चंद्रकांत सोनवणे, वर्षा चंद्रकांत सोनवणे, सुजल चंद्रकांत सोनवणे, धनश्री रोशन खरे, पद्माबाई एकनाथ डव सर्व राहणार आणि हनुमान मंदिराजवळ भवानीनगर वागळे इस्टेट ठाणे यांच्याविरुद्ध एरंडोल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल विलास पाटील करीत आहे.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह