जळगाव लाईव्ह न्यूज । २२ एप्रिल २०२२ । महिलांवर अत्याचार होण्याचे प्रमाण काही कमी होताना दिसत नाही. दिवसेंदिवस अत्याचाराच्या प्रकार वाढत असताना दिसत आहे. अशातच पाचोरा तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे मुलाला मारण्याची धमकी देत एका २४ वर्षीय महिलेवर जबरदस्ती अत्याचार करण्यात आला आहे. याबाबत पाचोरा पोलीस ठाण्यात आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.
काय आहे घटना?
पाचोरा तालुक्यात राहणारी २४ वर्षीय महिला ही बकरीचा चारा घेण्यासाठी शेतात गेली होती. यावेळी नितीन एकनाथ जाधव याने पिडीत महिलेस तिच्या मुलाला मारण्याची धमकी देत जबरदस्ती अत्याचार केला. तसेच १९ एप्रिल २०२२ रोजीच्या संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास आनिल काळे, संदीप जाधव आणि एका महिलेने पिडीतेच्या घरात घुसून शिवीगाळ करुन मारहाण केली. तसेच पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यास जिवे ठार मारण्याची धमकी दिली.
एवढेच नव्हे तर अनिल काळे याने पिडीत महिलेस ‘शारीरीक संबंध करुन दे’, असे सांगुन साडी ओढली. तर संदीप जाधव याने पिडीतेचे ब्लाउज फाडले. तसेच नितीनचा पाहुणा भरत याने तिला शिवीगाळ केली.
या अत्याचाराबाबत पिडीत महिलेने आपल्या पतीस सांगितले. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात नितीन जाधव, संदीप जाधव, नितीनचा पाहुणा भरत, नितीनच्या नातेवाईक तीन महिला आणि अनिल देविदास काळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अनिल देविदास काळे, संदीप जाधव या दोघांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजया वसावे ह्या करीत आहेत.