आजचे बजेट स्टार्टअप्सला पाठबळ देणार – अर्थमंत्री

जळगाव लाईव्ह न्यूज । १ फेब्रुवारी २०२३ । 2023-24 या वर्षासाठीचा केंद्रीय अर्थसंकल्प 2023 केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केले. यावेळी त्यांनी अर्थसंकल्प संसदेत सादर केला. यावेळी स्टार्टअप्स पाठबळ देणार असल्याचे त्या म्हणाल्या.

हा अर्थसंकल्प देशाच्या अमृत काळातला पहिला अर्थसंकल्प आहे. गेल्या वर्षी भारतात देशांतर्गत आणि विदेशी पर्यटकांचा वाढला आहे. यातून मोठ्या रोजगाराच्या संधी वाढल्या आहेत. अशावेळी पर्यटन हे रोजगार बनले आहे.असे त्या म्हणाल्या

याचबरोबर सर्वसमावेशक विकास, शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचणार पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक क्षमतांचा खऱ्या अर्थाने वापर करणे, हरित विकास, आर्थिक क्षेत्र प्राधान्य सरकारचे असणार असल्याचे यावेळी निर्मला सीताराम यांनी सांगितले. त्यासाठीच कृषी क्षेत्राचा विकासासाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे असे त्या म्हणाल्यामोदी सरकारच्या या अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांना महागाईपासून दिलासा मिळण्याची आशा असताना दुसरीकडे पगारदार वर्गातील करदात्यांना प्राप्तिकरात दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. यावेळी लोकांना केंद्रीय अर्थसंकल्पातून अधिक दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. कारण हा अर्थसंकल्प मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा असणार आहेत.