जळगाव लाईव्ह न्यूज । ९ एप्रिल २०२२ । गेल्या दोन तीन दिवसांपासून घाेंगावणारे अवकाळी पावसाचे ढग निवळले आहेत. त्यामुळे पुन्हा तापमानाचा पारा वाढू लागला आहे. आधीच मार्च महिन्यापासून जळगाव शहरासह जिल्ह्यात तापमानाचा पारा(Temperature) ४० अंशावर गेला आहे. यात काल सलग चाैथ्या दिवशी जिल्ह्यात पारा ४४ अंशांपुढे गेला. वाढत्या तापमानामुळे नागरिक कमालीचे हैराण होत आहेत. आज शनिवारी सकाळी ११ वाजेपासूनच पारा ३९ अंशावर गेला आहे.
मागील काही दिवसापासून तपामान चाळीशीपर्यंत होते, मात्र शुक्रवारी त्यात आणखी वाढ होऊन शहरासह जिल्ह्याचे कमाल तापमान प्रथमच ४४ अंशांपर्यंत पोहोचले. यंदाच्या मोसमातला मार्चपासूनच राज्यासह जिल्ह्याचा तापमानाचा पारा ४० अंशावर गेला आहे. त्यामुळे एप्रिल आणि मे महिना संपेपर्यंत आणखी किती उष्णतेला शहरवासियांना सामोरं जावं लागेल, याची चिंता नागरिकांना सतावत आहे.काल शुक्रवारी वातावरण केवळ ५ टक्के एवढेच ढगाळ हाेते. सलग चाैथ्या दिवशी तापमान ४४.२५ अंशांच्या उच्चांकावर असल्याने उष्णतेची लाट तीव्र आहे.
आजचे दिवसाचे तापमान असे?
सकाळी ११ वाजेल – ३९ अंश
दुपारी १२ ला – ४१ अंश
१ वाजेल – ४२ अंश
२ वाजेल – ४२ अंशापुढे
३ वाजेल – ४३ अंशापुढे
४ वाजेल – ४२ अंशापुढे
५ वाजेल – ४१ अंशापुढे
६ वाजेल – ४० अशा खाली
(वरील तापमान ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आले आहे. त्यात कमी जास्त तापमान होऊ शकते.)