⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

जळगावकर उकाड्याने हैराण ; वाचा आज दिवसभर कसं राहणार तापमान

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ मे २०२३ । सध्या महाराष्ट्रासह देशभरातील नागरिक उकाड्याने त्रस्त झाले आहेत. गेल्या काही दिवसापूर्वी देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद जळगावमध्ये झाली होती. यामुळे वाढत्या तापमानाने नागरिक जळगावकर होरपळून निघत आहेत. उकाड्याने हैराण झालेल्या जळगावकरांना काही प्रमाणात दिलासा मिळताना दिसत नाही.

शनिवारी तापमान ४२ अंश सेल्सिअस पर्यंत नोंदविले गेलं. तर आज देखील दिवसभर तापमान ४२ अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याची शक्यता आहे. यापूर्वी शुक्रवारी जळगावमधील कमाल तापमान ४३.२ अंशावर गेला. तर किमान तापमान २६. ५ अंशावर गेलं होते. हवामान खात्याने 24 मे पर्यंत तापमान वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

सध्या वाहणाऱ्या हव्यामुळे वातावरणात सकाळी 10 वाजेपर्यंत काहीसा गारवा जाणवत आहे. मात्र दुपारनंतर सूर्यनारायणाचा प्रकोप पाहायला मिळत आहे.

आज कसे राहणार दिवसभर तापमान?
-सकाळी 10 वाजेपर्यंत – 33
-त्यानंतर सकाळी 11 वाजेपर्यंत 3 अशांनी वाढून 36 पर्यंत राहील
– दुपारी 12 वाजेला – 38 अंशावर जाईल
– दुपारी 1 वाजेला 40 अंश
– दुपारी 2 वाजेला – 41 ते 42 अंश
-दुपारी 3 वाजेला – 42 अंशापेक्षा जास्त
-सायंकाळी 4 वाजेला – 42 अंश
-सायंकाळी 5 वाजेला – 41अंश
– सायंकाळी 6 वाजेला – 40 अंशपर्यंत
– सायंकाळी 7 वाजेला – 38 अंश पर्यंत