जळगाव लाईव्ह न्यूज । १५ फेब्रुवारी २०२५ । व्यापारी धोरणाबाबत ट्रम्पची धोरण भारतासाठीच नाही तर जगातील अनेक देशांसाठी डोकेदुखी ठरत आहे. याचा परिणाम मौल्यवान धातूंवरही दिसून आला आहे. एकीकडे लग्नसराई सुरु असताना सोने आणि चांदीचा भाव भारतीय सराफा बाजारात दररोज नवीन रेकॉर्डवर रेकॉर्ड करत आहे. सोन्यासह चांदीच्या किमतीने विक्रमी उच्चांक गाठल्याने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना घाम फुटला आहे.

सोन्याच्या किमतीत सतत वाढ होत राहण्याचा ट्रेंड सुरूच असून शुक्रवारी स्थानिक सराफा बाजारात सोन्याचा भाव १,३०० रुपयांनी वाढून ८९,४०० रुपये प्रति १० ग्रॅम, या नवीन विक्रमी पातळीवर पोहोचला. दुसरीकडे चांदीचा भावही २००० रुपयांनी वाढून एक लाख रुपये प्रति किलो झाला, जो चार महिन्यांतील सगळ्यात जास्त आहे. कमकुवत अमेरिकी डॉलर आणि ट्रम्प टॅरिफ धोरणांमुळे सोन्याच्या किमतीत तेजी असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
जळगावातील भाव?
जळगाव सराफ बाजारात सोने दर शुक्रवारी जळगाव बाजारात विनाजीएसटी ८६४०० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचले. तर 22 कॅरेट सोने ७९ हजारपार गेले आहे. चांदीच्या दरातही एका दिवसात एक हजारांनी वाढ झाली असून गुरुवारी प्रतिकिलो 97 हजार रुपये असलेली आता विनाजीएसटी ९८ हजारावर गेली आहे. तर जीएसटीसह चांदीचा दर १ लाख रुपयांवर पोहोचला आहे.