⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

वीजेसंबंधी अडचणी सोडवण्यासाठी महावितरणाने ‘एक गाव एक दिवस’ हा उपक्रम हाती घेतला

जळगाव लाईव्ह न्यूज । १९नोव्हेंबर २०२१ ।  सर्व ग्राहकांच्या वीजेसंबंधी अडचणी सोडवण्यासाठी ‘एक गाव एक दिवस’ हा उपक्रम महावितरणने हाती घेतला आहे. आता थेट महावितरणचे कर्मचारी तुमच्या दारात येणार आहे. सौरऊर्जेमुळे शेतकऱ्यांची चांगली सोय झाली आहे. त्यानंतर शेतकऱ्यांसह रब्बीचा हंगाम सुरू झाला असून शेती पंपाच्या बीज मागणीत वाढ झाली आहे. त्यामुळे या उपक्रमाचा शेतकऱ्यांना मोठा लाभ होणार आहे. त्याचे तालुकानिहाय नियोजन केले जात असून जिल्ह्यात लवकरच याची सुरुवात केली जाणार असल्याची माहिती महावितरणचे मुख्य अभियंता कैलास हमने यांनी दिली.

वीजेसंबंधी शेतकऱ्यांसह ग्राहकांच्या असलेल्या विविध समस्या सोडविणे तुटपुंजे साधने, वीज कर्मचाऱ्यांचे अपूर्ण मनुष्यबळ या व विविध समस्या या ग्राहकांच्या दारी जाऊन जाणून घेण्यासह तेथे सोडवण्यात येणाऱ्या समस्यांचे तात्काळ निवारण करण्यासाठी ही मोहिम राबवली जाणार आहे. थकबाकीमुळे वीज कनेक्शन तोडण्याच्या कारवायांमुळे ग्राहकांमध्ये नाराजी, संताप अशी स्थिती असताना ग्राहकांच्या समस्या जाणून घेवून त्यांना वीजेचे महत्व पटवून दिले जाणार आहे.

यासह थकबाकी वसुलीचेही नियोजन या माध्यमातून केले जाणार आहे. हा उपक्रम वीज समस्यांवर रामबाण उपाय ठरल्याने महावितरणकडून संपूर्ण राज्यात तो राबविला जात आहे. ज्या गावात वीज थकबाकीचा वसुली जास्त आहे. त्या गावाची निवड प्राधान्याने केली जाणार आहे. हा उपक्रम राबवत असताना पुरेसे मनुष्यबळ, साधनसामग्री सोबत घेऊन त्या त्या गावात पूर्ण लक्ष केंद्रित केले जाणार आहे. पूर्ण चौकशी करून त्या गावातील विजेच्या समस्या सोडल्या जाणार आहे. याचा प्रामुख्याने शेतकऱ्यांना लाभ होणार

वझुकलेले वीज खांब, तारांना ताण देणे, अनधिकृत भाराची समस्या सोडवणार

ग्रामीण भागातील वीज समस्या सोडण्यावर भर आहे. झुकलेले, मोडलेले वीज खांब उभे करणे, तारांना ताण देणे, जास्त झोळ असल्यास मधोमध नवीन खांब उभा करणे, स्पेसर लावणे, रोहित्राची व वितरण पेटीची दुरुस्तीची कामे करणे, अनधिकृत भार काढून त्यांच्यावर कारवाई करणे, नवीन कनेक्शन घेण्यास प्रवृत्त करणे आदी कामे केली जाणार आहेत. यासह वीज बिलातील त्रूटी, नावात बदल या तक्रारींचेही जागेवर निराकरण करण्याचे काम या उपक्रमातून होणार असल्याचे अभियंता हुमने यांनी सांगितले.