प्रलंबित मागण्यासाठी लोकसंघर्ष मोर्चाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे
जळगाव लाईव्ह न्यूज । ४ मार्च २०२२ । जिल्ह्यात कोरोनामुळे एकल झालेल्या महिलांबाबत प्रलंबित असलेले प्रश्न तात्काळ सोडवण्यात यावे, या मागणीसाठी महिला लोकसंघर्ष मोर्चातर्फे जिल्हाधिकारी कार्यलयासमोर एक दिवशीय धरणे आंदोलन करण्यात आले. दरम्यान जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी या योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना ३१ मार्च पर्यंत लाभ देण्याचे आश्वासन दिले.
मागण्या अश्या
जिल्ह्यातील सर्व कोरोना एकल महिलांना विधवा पेन्शन योजना चालू व्हावी, कोरोना एकल महिलांना अंतोदय योजने अंतर्गत रेशन मिळावे, सुप्रीम कोर्टाच्या आदेशनुसार सर्वांना तात्काळ 50 हजार रुपये मिळावेत, बालसंगोपन योजना तात्काळ सुरू व्हावी,
शिवणकाम, शेती, ब्युटीपार्लर , अश्या विविध कौशल्य असणाऱ्या कोरोना एकल महिलांना विविध योजनांचा लाभ मिळावा, शासनाच्या विविध शासकीय योजना मधे उदा.ग्रामीण भागात मनरेगा, महिला बाल कल्याण, कृषी, खादी ग्रामोद्योग, पशू पालन, कुकुट्ट पालन योजनांचा लाभ मिळावा, शिक्षा अभियानांतर्गत प्रत्येक शाळेला आर्टीई (right to education act) अंतर्गत मुलांना फी माफी देण्यात यावी, ज्या महिलांच्या पती खाजगी रुग्णालयात एडमिट असताना अधिक फी लागली त्याचे ऑडिट करून तात्काळ जास्तीची फी परत करावी, शासकीय, अनुदानित वा खाजगी ठिकाणी कामावर असलेल्या पुरुषांना आपला जीव गमवावा लागला त्या ठिकाणी संबंधित महिलेला अनुकंपावर तात्काळ लावण्यात यावे, जे सरकारी नोकरीत होते व त्यांचा कामावर कार्यरत असताना मृत्यू झाला अश्या सर्व महिलांना 50 लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी, वात्सल्य समिती व जिल्हा समिती यांच्या नियमित बैठका होवून महिलांचे प्रश्न सोडवण्यात यावे, ज्या महिलांना अजून वारस हक्काप्रमाने पतीच्या संपत्तीत वाटा मिळाला नाही त्यांना तात्काळ कायदेशीर विधी व न्याय विभागाकडून मदत मिळवून देत न्याय द्यावा तसेच वारस प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी विधी व न्याय विभागाने विशेष कॅम्प चे आयोजन करत न्याय द्यावा, अश्या विविध मागण्या करण्यात आल्या असून याबाबत जिल्हाधिकारी यांनी ३१ मार्च पर्यंत कायद्या प्रमाणे पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यात देईल असे आश्वासन दिले आहे.