---Advertisement---
जळगाव जिल्हा जळगाव शहर

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात महिलेला ४२ व्या वर्षी मिळाले मातृत्व !

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० जून २०२३ । जामनेर येथील महिलेला ४२ व्या वर्षी मातृत्व मिळवून देण्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागाच्या पथकाला यश मिळाले आहे. या महिलेची सिजर शस्त्रक्रिया होऊन तिला सुदृढ मुलगा झाला आहे. यशस्वी उपचार झाल्यानंतर या महिलेला अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांच्या हस्ते रुग्णालयातून निरोप देण्यात आला.

mother at 42 jpg webp webp

जामनेर येथील रहिवासी मुक्ताबाई राजू चौधरी यांना बीपी जास्त झाल्यामुळे जामनेर ग्रामीण रुग्णालयातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव या ठिकाणी रेफर करण्यात आले होते. त्या गरोदर देखील होत्या. जळगावच्या रुग्णालयात आल्यावर स्त्रीरोग व प्रसूती शास्त्र विभागाच्या डॉक्टरांनी तिची तपासणी केली.

---Advertisement---

तपासणीमध्ये महिलेचा बीपी वाढला होता तसेच गर्भात असलेल्या बाळाचे ठोके कमी होत होते. त्यानंतर तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार महिलेची सिजर शस्त्रक्रिया करण्यात आली. महिलेने गोंडस व सुंदर मुलाला जन्म दिला.

वैद्यकीय पथकाकडून यशस्वी उपचार झाल्याबद्दल आणि आत्मीयतेची वागणूक मिळाल्यामुळे महिलेने व तिच्या कुटुंबीयांनी वैद्यकीय पथकाचे आभार मानले. सदर महिलेवर शस्त्रक्रिया व उपचार करण्याकामी सहयोगी प्रा. डॉ. संजय बनसोडे, सहा.प्रा. डॉ. मिताली गोलेच्छा, निवासी डॉ. राहुल कातकडे, डॉ. विनेश पावरा, डॉ.रणजीत पावरा, डॉक्टर पूजा बुजाडे आदी डॉक्टरांसह इन्चार्ज परिचारिका निला जोशी, रत्ना कुंभार आदींनी परिश्रम घेतले.

सदरहू महिलेला आषाढी एकादशीच्या दिवशी अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड यांच्या उपस्थितीमध्ये रुग्णालयातून निरोप देण्यात आला.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---