---Advertisement---
मुक्ताईनगर पर्यटन

बुद्ध पौर्णिमेला झाले वाघाचे दर्शन, व्हिडीओ व्हायरल, वन्यप्रेमींना आतुरता

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । मुक्ताईनगर | सुभाष धाडे | गेली दोन वर्ष कोरोनामुळे प्राणीगणना होऊ शकली नाही. यावर्षी शासनाकडून निर्बंध हटविल्यामुळे प्राणीगणना होत असुन वन्यप्रेमीमध्ये आनंदाचे वातावरण असुन वाघांसाठी सुप्रसिद्ध असलेल्या जळगांव जिल्ह्यातील वडोदा वनक्षेत्रात मोठ्यासंख्येने मानद वन्यजीवरक्षकांसह वन्यप्रेमी मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. जंगलातील मचानावर रात्र जागवुन प्राणीगणनेच्या तयारीत असतांना वनक्षेत्रातील दुई येथील शिवारालगच्या वनहद्दीत स्थानिकांनी कुऱ्हा-मुक्ताईनगर रस्त्याच्या कडेला पट्टेदार वाघ तात्पुरती विश्रांती घेत असताना आढळुन आला. दुई येथील रविंद्र जावळे मुक्ताईनगरहुन घरी परतत असताना वाघाचे दर्शन झाले. त्यांनी मोबाईल मध्ये समोरील दृष्य कैद केले.

tiger muktainagar forest area

बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी पक्षी आणि पशु गणना केली जाते. वढोदा वनपरिक्षेत्रात गेल्या महिन्याभरापासून वाघ दर्शन देत आहे. व्याघ्र दर्शनासाठी बुध्द पोर्णिमेच्या पार्श्वभूमीवर प्रगणनेसाठी वढोदा वनक्षेत्रात मोठ्यासंख्येने वन्यप्रेमी दाखल झाले असून जंगलात रवाना होत असतांना दुई वनहद्दीलगत थेट रस्त्यावरुन स्थानिक लोकांनी आपल्या मोबाईलमध्ये वाघाला कैद केले. राशा बरड नाल्याजवळ वाघ बसलेला होता.

---Advertisement---

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---