---Advertisement---
राजकारण मुक्ताईनगर

मुक्ताई उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून परिसर सुजलाम सुफलाम होईल – रोहिणी खडसे

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १० नोव्हेंबर २०२२ । राष्ट्रवादी जनसंवाद यात्रेच्या तिसाव्या दिवशी रोहिणी खडसे यांनी मुक्ताईनगर तालुक्यातील सातोड, चिखली, मन्यारखेडा, रुईखेडा येथिल ग्रामस्थां सोबत संवाद साधला यावेळी त्यांच्या सोबत यात्रा प्रमुख निवृत्ती पाटील, ईश्वर रहाणे, जि प सदस्य निलेश पाटील, माजी सभापती विलास धायडे, प्रदिप साळुंखे, यात्रा सह प्रमुख रामभाऊ पाटील, चंद्रकांत बढे,सरचिटणीस सुनिल काटे, नंदकिशोर हिरोळे, विजय भंगाळे,विनोद काटे, बाळा भाऊ भालशंकर,राहुल पाटील,विजय कापसे,योगेश पाटील , सुभाष खाटीक, प्रकाश खोंदले,सोनु पाटील, विशाल रोटे चंद्रशेखर बढे, विजय भंगाळे, प्रेमचंद बढे, चंद्रकांत बढे,बाबुराव पाटील, वासुदेव घाडगे अतुल पाटील,विजय पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते

यावेळी ग्रामस्थांसोबत संवाद साधताना रोहिणी खडसे म्हणाल्या कि, रुईखेडा परिसरातील गावांची जास्तीस्त जास्त शेती ही कोरडवाहू आहे या गावातील शेतीला पाणी मिळावे यासाठी एकनाथराव खडसे यांनी मुक्ताई उपसा सिंचन योजनेची निर्मिती केली. या योजनेचे नव्वद टक्के काम पूर्णत्वास आले आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांनी राहिलेल्या अपुर्ण कामासाठी भरीव निधी देण्याचे आश्वासन दिले होते परंतु सरकार गेल्यामुळे या कामाला ब्रेक लागला आगामी काळात एकनाथराव खडसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून पाठपुरावा करून लवकरच मुक्ताई उपसा सिंचन योजनेचे पाणी रुईखेडा परिसरातील शेतीपर्यंत आणले जाईल यातून हा परिसर सुजलाम सुफलाम होण्यास मदत होईल एकनाथराव खडसे यांनी रुईखेडा परिसरातील प्रत्येक गावात रस्ते, सभागृह, शिक्षण, आरोग्य इतर मुलभूत सुविधांसाठी आतापर्यंत भरगोस निधी उपलब्ध करून दिला राहिलेले विकास कामे पुर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत

roohini khadse jpg webp webp


गेले तिस वर्ष तुमच्या सर्वांच्या साथीने सहकार्याने नाथाभाऊ यांनी भारतीय जनता पक्ष खेडोपाडी पोहचवला परंतु भाजप ने अपमानास्पद वागणूक देऊन नाथाभाऊ यांना भाजप सोडण्यास भाग पाडले नाथाभाऊ यांचे राजकीय अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न केला परंतु शरद पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून एकनाथराव खडसे यांना विधानपरिषदेत आमदार बनवले. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढविण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे म्हणून जास्तीत जास्त संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सभासद व्हा असे रोहिणी खडसे यांनी उपस्थितांना आवाहन केले.

यावेळी रुईखेड येथील चंद्रशेखर बढे, विजय भंगाळे, प्रेमचंद बढे, चंद्रकांत बढे,बाबुराव पाटील,भागवत पाटील, वासुदेव घाडगे,रामभाऊ पाटील,श्रीरंग गुरचळ,संजय नारखेडे, चंद्रकांत नारखेडे, विजय नारखेडे,हबीब वंजारी,अतुल बढे, शरद बढे, विकास घटे,बारसू पाटील,विलास लोखंडे,आलम वंजारी,अल्ताब वंजारी, रजाक वंजारी,जगन्नाथ भंगाळे,किसन कपले,गजानन लोखंडे, रविंद्र गुरचळ,भगवान भंगाळे, सातोड येथील रघुनाथ पाटील, शेषराव पाटील, जनार्धन पाटील, समाधान पाटील, पुंजाराम पाटील, रविंद्र डहाके, भास्कर घटे,सुकलाल पाटील,मनोहर नाफडे चिखली येथील रामराव वाघ, सुभाष खाटीक, प्रकाश खोंदले,प्रभाकर सोनवणे, विजय कुमार काकडे,देवराम बोडखे, श्रीकृष्ण कांडेलकर, बाळू पाटील, विश्वनाथ पाटील, देवराम महाजन,सुरेश पाटील, गोविंद सोनवणे, कैलास वाघ, काशिनाथ वाघ, गोपाळ महाराज मन्यरखेडा येथिल विजय पाटील, दिनकर पाटील, बळीराम पाटील, अशोक पाटील, प्रताप पाटील, सुरेश पाटील, पंडित सोनवणे, उत्तम सोनवणे आणि ग्रामस्थ उपस्थित होते

---Advertisement---

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---