शिंदाड ग्रामपंचात मार्फत रोगनिदान तपासणी शिबीर
जळगाव लाईव्ह न्यूज । १५ एप्रिल २०२२ । पाचोरा तालुक्यातील शिंदाड ग्रामपंचातीच्या वतीने व सिद्धिविनायक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने शिंदाड येथे माेफत रोगनिदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले.
शिंदाड येथील राम मंदिर परिसरात सकाळी ८ ते दुपारी २ वाजेदरम्यान शिबिर घेण्यात आले. या वेळी डॉ. स्वप्निल पाटील व डॉ. ग्रिष्मा पाटील यांनी नागरिकांची तपासणी करून औषधोपचार केले. या वेळी माजी जिल्हा परिषद सदस्य मधुकर काटे, शिंदाडचे सरपंच ज्ञानेश्वर तांबे, उपसरपंच नरेंद्र पाटील, ग्रामपंचायत सदस्य संदीप सराफ, विलास पाटील, डॉ. एस.आर.पाटील, डॉ. एल. टी. पाटील, डॉ. दीपक चौधरी, डॉ. अभिषेक पाटील, डॉ. राजेंद्र परदेशी, शाळा समितीचे अध्यक्ष संदीप बोरसे, बाळू श्रावणे, सतीश बोरसे व सर्व आशासेविका उपस्थित होत्या. हे शिबिरांचे आयोजन केल्या बदल ग्रामपंचायत सदस्य व नागरिकांनी डॉ. स्वप्निल पाटील यांचे आभार मानले. या शिबिराचा नागरिकांनी लाभ घेतला.