⁠ 
मंगळवार, मे 7, 2024

‘या’ ग्रामपंचायतीद्वारे मिळणार दिव्यांगांना घरपट्टीत ५० टक्के सवलत

जळगाव लाईव्ह न्यूज। ३ ऑगस्ट २०२३। आडगाव येथील ग्रामपंचायतीतर्फे गावातील दिव्यांग व्यक्तीना त्यांच्या हक्काचा पाच टक्के निधी सुपूर्द करण्यात आला. या वेळी सरपंच सुनील भिल, ग्रामपंचायत सदस्य प्रल्हाद पाटील, प्रवीण पाटील, रवींद्र सावडे, सीमा महाजन, ग्रामविस्तार अधिकारी चव्हाण, कारकून भरत पाटील, रामचंद्र पाटील उपस्थित होते.

गेल्या चार ते पाच वर्षांपासून दिव्यांगांना पाच टक्के निधी वितरीत करण्याचे काम रखडले होते. परंतु सरपंच व सदस्यांच्या कमिटीने व ग्रामविस्तार अधिकारी यांच्या सहकार्याने दिव्यांगांना पाच टक्के निधी देण्याचे ठरले.

या वर्षाच्या ५ टक्के निधी व मागील राहिलेला निधी असा प्रत्येक लाभार्थ्याला एक हजाराचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. तसेच ज्या दिव्यांगांचे बँकेत खाते आहे, अशा लाभार्थ्यांच्या खात्यावर आठ ते दहा दिवसांत एक हजार रुपये जमा होतील, तसेच दिव्यांगांच्या घराच्या कमिटीमध्ये ५० टक्के सूट देण्याचे देखील मासिक सभेत निर्णय घेण्यात आला.

आता यापुढे अपंगांना घर कमिटी मध्ये ५० टक्के सूट देखील मिळणार आहे अनेक दिवसांनी मिळालेला अपंगाच्या हक्काचा निधी मिळाल्यामुळे अपंगांमध्ये अपंग बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले गावातील एकूण ७५ अपंग बांधवांना याच्या लाभ मिळणार आहे