⁠ 
सोमवार, जुलै 22, 2024

नशिराबाद येथे निर्दयीपणे म्हशींची वाहतूक करणारे तीन वाहन पकडले ; जवळपास 37 लाखाचा मुद्देमाल जप्त

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १ ऑक्टोबर २०२३ । नशिराबाद गावानजीक राष्ट्रीय महामार्गावरील टोल प्लाझा येथे बेकायदेशीरित्या व विनापरवाना तीन वाहनांमध्ये ५३ म्हशी कोंबून घेऊन जाणारी वाहने पकडली. याप्रकरणी पोलिसांनी तीन वाहनचालकांना ताब्यात घेतले असून म्हशी, वाहने असा एकूण ३६ लाख ९० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

नेमकी काय आहे घटना?
नशिराबाद पोलिस ठाण्याचे सहाय्यक फौजदार हशरत अली सय्यद अलीसह कर्मचारी (ता. २९) रात्री गस्त करीत असताना नशिराबाद टोल प्लाझावरून डायल ११२ वरून जनावरांची चोरटी वाहतूक होत असल्याबाबत फोन आला. त्यानुसार शनिवारी ३० सप्टेंबर रोजी रात्री १ वाजता नशिराबाद पोलिसांनी राष्ट्रीय महामार्गावर नाकाबंदी लावून तिनही वाहनाची तपासणी केली.

यावेळी संबंधित वाहनचालकांना जनावरे वाहतूक करण्याचा परवाना मागणी केली असता, चालकांनी परवाना नसल्याचे सांगितले. या तिन्ही चालकांनी वाहनांमध्ये म्हशींना निर्दयतेने दाटीवाटीने कमी जागेत भरून अवैध वाहतूक करून नेतानामिळून आले.

दोन वाहनांमधून प्रत्येकी १८ व एका वाहनातून १७ म्हशींची वाहतूक सुरू असल्याचे आढळून आले. त्यावेळी पोलिसांनी तीनही वाहने व म्हशी असा एकुण ३६ लाख ९० हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

याप्रकरणी पोहेकॉ अतुल महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सायन खान कलीम खान (२८, रा. बलखड, जि. खरगोन, मध्यप्रदेश), साहीद खान सलीम खान (३५, रा. बालासमट, जि. खरगोन, मध्यप्रदेश), समीर शहा सिद्धीक शहा (२९, रा. देवास, इंदूर, मध्यप्रदेश) यांच्याविरुद्ध नशिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार हरेष पाटील करीत आहेत.