जळगाव लाईव्ह न्यूज । जळगावकर रेल्वे प्रवाशांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. ती म्हणजे पश्चिम रेल्वेच्या जळगाव, भुसावळमार्गे धावणाऱ्या तीन साप्ताहिक रेल्वेंना सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

या गाड्यांना मुदतवाढ?
रेल्वे क्रमांक ०९०२५ वलसाड-दानापूर दर सोमवारी आता २९ सप्टेंबरपर्यंत धावणार आहे. ०९०२६ दानापूर-वलसाड रेल्वे दर मंगळवारी आता ३० सप्टेंबरपर्यंत धावेल. रविवारची ०९०३१ उधना-जयनगर रेल्वे २८ सप्टेंबरपर्यंत तर जयनगर-उधना रेल्वे (दर सोमवार) २९ सप्टेंबरपर्यंत धावणार आहे. त्याचबरोबर ०९०४५ उधना-पटना (शुक्रवार) ही रेल्वे २६ सप्टेंबरपर्यंत तर ०९०४६ पटना ते उधना (शनिवार) २७ सप्टेंबरपर्यंत धावणार आहे. त्यामुळे विभागातील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

‘अमृत भारत’ची प्रतीक्षा
सहरसा ते लोकमान्य टिळक टर्मिनस अमृत भारत एक्स्प्रेसचे २५ एप्रिल रोजी जळगाव स्थानकावर स्वागत करण्यात आले. अडीच महिन्यांचा कालावधी उलटूनही या रेल्वेचे अद्याप नवीन वेळापत्रक जाहीर झालेले नाही. यामुळे २५ एप्रिलनंतर ही रेल्वे दिसून आली नाही. अजूनही जळगावकरांना अमृत भारत रेल्वेची प्रतीक्षा रेल्वे प्रवाशांना लागून आहे.








