जळगाव लाईव्ह न्यूज । २३ एप्रिल २०२२ । यावल शहरातील बोरावल गेट भागात पाण्याची नळी लावण्यावरून गुरुवारी सायंकाळी सहा जणांवर हल्ला करण्यात आला होता. या घटनेतील सात संशयित आरोपींपैकी तिघांना येथील पोलिसांनी ताब्यात घेतले हाेते. त्यांना रितसर अटक करून शुक्रवारी येथील न्यायालयात हजर केले. तिघांना २५ एप्रिलपर्यंत चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
तर उर्वरित फरार चार संशयितांचा पोलिस कसून शोध घेत असून दाेन पथके रवाना करण्यात आली. तपास पाेउनि सुदाम काकडे करत आहे.