⁠ 
मंगळवार, डिसेंबर 3, 2024
Home | जळगाव जिल्हा | भडगाव | अपघातांची मालिका थांबेना! कार अपघातात तिघे जागीच ठार

अपघातांची मालिका थांबेना! कार अपघातात तिघे जागीच ठार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ मे २०२२ । जळगाव जिल्ह्यात अपघाताचे प्रमाण वाढतानाचे दिसून येतेय. दोन दिवसापूर्वीच मुक्ताईनगर तालुक्यात भीषण अपघातात ५ जण ठार झाल्याची बातमी ताजी असताना भडगाव तालुक्यात कार अपघातात ३ जण जागीच ठार झाल्याची घटना घडलीय. गुरांना वाचवण्याचा प्रयत्नात भरधाव कार निंबाच्या झाडावर आदळली, त्यात तीन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्घटना घटना पळासखेडाजवळ घडली आहे.

काय आहे नेमकी घटना?

पळासखेडा (ता.भडगाव) येथून चारचाकीने (क्रमांक- एम.एच.१९, सी.एफ. १८०३) किसन राठोड, पवन राठोड व जितेंद्र पवार हे तिघेही तरवाडे गावाकडे जात हाेते. कार भरधाव असताना रस्त्यावर समोरून येणाऱ्या गुरांना वाचवण्याचा प्रयत्नात वाहन रस्त्याच्या बाजूला असलेल्या निंबाच्या झाडावर आदळले. यात किसन लखीचंद जाधव (वय ४०, रा. गाळण, ता. पाचोरा,), पवन इंदल राठोड (वय २६, रा. गाळण ह. मु. टिटवाळा ता. कल्याण) आणि जितेंद्र काशिनाथ पवार (रा. ठाकुर्ली, ता. कल्याण, जि. ठाणे) हे तिघे जबर जखमी झाले. परिसरातील ग्रामस्थांनी धाव घेऊन त्यांना भडगावच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता तिघांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.

नातेवाइकांना भेटण्यास जाणे बेतले जीवावर
पाचोरा येथील डॉक्टरांच्या वाहनावर चालक असलेला किसन हा पळासखेडाजवळ लग्नाला वाहन घेऊन आला होता. त्याच वाहनात सजवून नवरा-नवरीला घरी घेऊन जाणार होता. मात्र, बिदाईला उशीर असल्याने तेवढ्या वेळेत नातेवाइकांना भेटण्यासाठी तो जात होता.किसन लखीचंद जाधव

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.