जळगाव लाईव्ह न्यूज । ४ ऑगस्ट २०२२ । शहरातील विविध ठिकाणी घरफोडी करणाऱ्या तिघांना एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे.
शहरातील मेहरुन्नीसा शेख नियाजोद्दीन या गृहिणी त्यांच्या घराला कुलूप लावून शेजारी राहणाऱ्या पुतण्याकडे गेल्या होत्या. त्यांच्या बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी 20 हजार रुपये रोख आणि 20 हजार रुपयांचे दागिने असा एकुण 40 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरुन नेला होता. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनास्थळी सहायक पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांनी भेट देत तापासकामी सुचना दिल्या होत्या. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान हा गुन्हा रेकॉर्डवरील गुन्हेगार इश्तीयाक अली राजीक अली रा. शाहुवालीया मशीद जवळ, तांबापुरा, जळगाव, सलीम उर्फ सल्या शेख कय्युम, रा. बिस्मील्ला चौक, तांबापुरा, जळगाव व सरजील सैय्यद हरुन सैय्यद, रा. एकता हॉल जवळ, मास्टर कॉलनी, जळगाव यांनी केल्याचे निष्पन्न झाले.