⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | गुन्हे | चाकूचा धाक दाखवून भाविकांना लुटणाऱ्या तिघांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

चाकूचा धाक दाखवून भाविकांना लुटणाऱ्या तिघांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । चाळीसगाव येथील बामोशी बाबा दर्गा परिसरात झोपलेल्या भाविकांना चाकूचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या मालेगाव येथील तिघांना चाळीसगाव शहर पोलिसांनी पाठलाग करून पकडले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या आदेशान्वये पोलीस उपनिरीक्षक गणेश रायकर, हवालदार योगेश बेलदार, अजय पाटील, पोका. निलेश पाटील, शरद पाटील, नरेंद्र चौधरी, अमोल भोसले असे चाळीसगाव शहरात अहिल्यादेवी चौक परिसरात गस्त घालत होते. तेव्हा पिर मुसा कादरी बाबा दर्गा परिसरात झोपलेल्या भाविक लोकांना काही इसम चाकूचा धाक दाखवून पैसे व मौल्यवान वस्तु हिसकावण्याचा प्रयत्न करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेतली असता सदर इसम रून जात अहिल्यादेवी चौकाकडे दुचाकीवरून पळाल्याचे कळाले. तीन इसम दुचाकीवरून असल्याचे दिसताच पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून विरेश इलेक्ट्रीकसमोर त्यांच्या दुचाकीला अडवले. या संशयितांची पोलिसांनी विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांना शहर पोलिस ठाण्यात आणून त्यांची चौकशी केली असता त्यांची नावे अस्लमखान शफीक खान व मोहम्मद अमान सफर अली दोन्ही रा. अस्माबाग मालेगाव व अन्सारी रमजान वलीजान रा. पवारवाडी मालेगाव असे सांगितली. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता लोखंडी कोयता, लोखंडी चाकू मिळून आला. शस्त्रे व दुचाकी पोलिसांनी ही असा ३० हजार रूपयांचा ऐवज जप्त केला. तिघे जबरी चोरीचा प्रयत्न करतांना मिळून आल्याने गुन्हा दाखल झाला.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.