⁠ 
रविवार, ऑक्टोबर 6, 2024
Home | गुन्हे | बार व्यवस्थापकाच्या डोक्यात बाटली फोडून साडेतीन लाख लुटले; जळगावातील घटना

बार व्यवस्थापकाच्या डोक्यात बाटली फोडून साडेतीन लाख लुटले; जळगावातील घटना

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ सप्टेंबर २०२४ । जळगाव जिल्ह्यात गुन्हेगारी कमी होताना दिसत नसून दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. दरम्यान, बिअर फुकटात दिली नाही म्हणून बार व्यवस्थापकाच्या डोक्यात बाटली फोडून गल्ल्यातील साडेतीन लाख रुपयांची रोकड तिघांनी लुटून नेल्याची घटना रविवारी रात्री साडेनऊ वाजता घडली. गुजराल पेट्रोल पंपा शेजारील एनएन बिअर बारमध्ये घडलेल्या या घटनेत दगडफेक व तोडफोड केल्याने गोंधळ उडाला. माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित, वपोलिस पथक दाखल झाले.

महामार्गावरील गुजराल पेट्रोल पंपाशेजारी असलेल्या एनएन बिअर बारमध्ये रात्री साडेनऊला तीन तरुण आले आणि त्यांनी पैसे न देता बिअरची मागणी केली. त्याला बारमधील कर्मचाऱ्याने विरोध केल्याने ते तिघे काउंटरकडे वळले. काउंटरवरील व्यवस्थापकाशी हुज्जत घातली. एकाने बिअरची अर्धी बाटली उचलून डोक्यात मारली. त्यापाठोपाठ दोघांनी बाहेर पळत जाऊन दगड आणले आणि बारमध्ये दगडफेक सुरू केली.

टेबल व सामानाची तोडफोड करत काउंटरच्या ड्रॉवरमधील साडेतीन लाख रुपयांची रोकड घेऊन आरोपी पसार झाले. माहिती मिळताच स्थानिक गुन्हा शाखेचे निरीक्षक बबन आव्हाड, अतुल वंजारी, जिल्हापेठ व रामानंदनगरचे पथक दाखल झाले. जखमी व्यवस्थापक है माजी सैनिक असल्याचे कळते. जखमी व्यवस्थापकांना घेऊन जात जिल्हापेठ पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती. संशयित तिघे आरोपी हे पिंप्राळ्यातील रहिवासी असून, त्यांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचे पथक रात्री उशिरा रवाना झाले आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.