केजरीवालांच्या आप पक्षात मोठी फूट ; राघव चड्ढासह तीन खासदार भाजपात जाणार

एप्रिल 24, 2026 4:39 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । आज देशाच्या राजधानी दिल्लीत एक मोठे राजकीय वादळ उठले आहे. केजरीवालांच्या आम आदमी पार्टीच्या संसदीय पक्षात मोठी फूट पडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ‘आप’चे संस्थापक सदस्य आणि राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत भारतीय जनता पक्षात जाण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

raghav

विशेष म्हणजे राघव चड्ढा हे फक्त एकटेच भाजपमध्ये प्रवेश करत नसून, राज्यसभेतील आणखी २ खासदारही त्यांच्या सोबत भाजपमध्ये जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे आम आदमी पक्षाला मोठा राजकीय धक्का बसल्याचे मानले जात आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून चड्ढा हे पक्ष सोडणार असल्याची चर्चा होती. तसेच त्यांना राज्यसभेत बोलू न देण्याचे पत्र देखील आम आदमी पक्षाने केली होती. तसेच अरविंद केजरीवाल यांची कोर्टाने निर्दोष मुक्तता केल्यानंतर राघव चड्ढा यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिली नव्हती. ते भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा सुरू होती. अखेर त्यांनी आज या सर्व चर्चेला विराम देत भाजपमध्ये जाण्याची अधिकृत घोषणा केली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now