⁠ 
सोमवार, एप्रिल 22, 2024

अडीच वर्षे घरी बसणाऱ्यांनी माझ्या बद्दल बोलू नये !

जळगाव लाईव्ह न्यूज | २५ एप्रिल २०२३ | अडीच वर्षे घरी बसणाऱ्यांनी माझ्या बद्दल बोलू नये.अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. यावेळी ते म्हणाले कि, मी सुट्टी घेतलेली नाही तर अनेकांना कायमचे सुट्टीवर पाठवलेले आहे,

अधिक माहिती अशी कि. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांपासून सातारा जिल्हा दौऱ्यावर आहेत. ते मूळ गावी दरे तांब येथे मुक्कामी आहेत. त्यांना भेटण्यासाठी नागरिक जात आहेत.

यावेळी पत्रकारांशी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले कि, गेले 2 दिवस मी माझ्या गावी आलो आहे. येथे येऊनही मला भेटण्यासाठी हजारो लोक येत आहेत. त्यांच्या समस्या मी ऐकून घेत आहे. त्यांच्याशी संवाद साधत आहेत. अधिकाऱ्यांच्या काही बैठकाही मी घेऊन काही प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच माझ्या परिसरात पर्यटनवाढीच्या अनुषंगाने सुरु असलेल्या कामांची पाहणी केली आहे.

याच बरोबर ते असेही म्हणले की, गेल्या सहा महिन्यांपासून भाजप-सेना युती म्हणून आम्ही काम करत आहोत. असंख्य प्रश्न, समस्या मार्गी लावल्या आहेत. लावत आहोत. सहा महिन्यात आम्ही एवढे काम केले आहे की येणाऱ्या निवडणुकीत आम्हीच म्हणजे आमची भाजप-सेना युती निवडणूक जिंकेल व आम्ही पुन्हा सत्तेत असू, असा विश्वास व्यक्त केला.