जळगाव जिल्हामुक्ताईनगर

विनयभंगाचा गुन्हा दाखल असणाऱ्यांनी महिलांचा सन्मान करणे आम्हाला शिकवू नये – शिवसेना

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ फेब्रुवारी २०२२ । सेनेच्या कार्यकर्त्यांकडून महिलांचा अनादर होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब यांनी केला आहे परंतु, आरोप करणाऱ्यावरच विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे. आम्ही शिवसैनिक महिलांचा आदर करतो. त्यामुळे विनयभंगाचा गुन्हा दाखल असणाऱ्यांनी आम्हाला महिलांचा सन्मान करणे शिकवू नये, असे शिवसेनातर्फे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.

मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील कु-हा बोदवड व सावदा या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे शरद युवा संवाद यात्रा निमित्त सभेचे आयोजन केले होते. याप्रसंगी मुक्ताईनगर तालुक्यातील शिवसैनिक तसेच आमदारां संदर्भात अपप्रचार व दिशाभूल करणारे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख तर्फे करण्यात आले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून आज शिवसेनेतर्फे पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यात शिवसेना अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हा संघटक अफसर खान, शहर प्रमुख गणेश टोंगे, युवासेना उपजिल्हाप्रमुख पवन सोनवणे, संतोष माळी, दीपक बोदडे, अनास खान, जिवराम कोळी उपस्थित होते.

यावेळी अफसर खान म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मेहबूब खान यांनी मुक्ताईनगर येथील आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठबळाने विजय झालेले आहेत परंतु, आता त्यांची भाषा बदलण्याचा आरोप केला आहे परंतु, गेले पंचवीस वर्षे शिवसेनेतर्फे राष्ट्रवादीला मदत करण्यात आलेली होती, आम्ही आजही विकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीच्या नेतृत्वाचा व पदाधिकाऱ्यांचा आदर करतो व भविष्यातही करीतच राहणार आहे. त्यामुळे बाहेरून येणाऱ्यांनी शिवसेनेची छबी खराब करू नये, त्यासोबतच 2024 मध्ये आमदार चंद्रकांत पाटील हे भाजपमध्ये जातील असा जावई शोध ही मेहबूब शेख यांनी लावला आहे. परंतु त्यांना आम्ही सांगू इच्छितो की, आम्ही कालही शिवसेनेत होतो आजही शिवसेनेत आहोत आणि भविष्यातही शिवसेनेतच राहणार आहोत. असे ठामपणे सांगितले.

राष्ट्रवादीचे मेहबूब शेख हे मुस्लिम समाजाचे नेतृत्व करतात त्यांना एकच सांगायचे आहे की, मुक्ताईनगर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष शाहीद खान राजीनामा का दिला? याचा विचार करावा मुक्ताईनगर तालुक्यात मेहबूब खान यांनी एक तरी मुस्लिम चांगले निर्माण करावे. त्यासोबतच त्यांनी असा आरोप केला की यावेळी माजी मंत्री एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची चर्चा सुरू होती. त्यावेळेस चंद्रकांत पाटील राष्ट्रवादी येण्यासाठी इच्छुक होते. अशी माहिती दिली परंतु उत्तर महाराष्ट्रातील बड्या नेत्याला आम्ही प्रवेश देऊ असे म्हटले होते. जर ते उत्तर महाराष्ट्रातील नेते असतील तर त्यांना बोदवड नगरपंचायत का राखता आली नाही ? आता सवालही अफसर खान यांनी केला.

शेवटी सेनेच्या कार्यकर्त्यांतर्फे महिलांना चांगली वागणूक दिली जात नसल्याचा आरोप मेहबूब शेख यांनी केला परंतु त्यांच्यावरच 2019 मध्ये औरंगाबाद खंडपीठात विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे अशा विनयभंगाच्या गुन्हा दाखल असणाऱ्यांनी आम्हाला महिलांचा सन्मान करणे शिकवू नये, असेही रोखठोकपणे पत्रकार परिषदेत सांगितले. त्याच प्रमाणे गायिका भारतरत्न लता मंगेशकर यांचे निधन झाल्याने देशात दुखवटा साजरा होत असताना युवा संवाद यात्रा कार्यक्रम झाला कसा ? यावरून महिलांचा सन्मान करण्याची परंपरा केवळ सेनेत असल्याचे सिद्ध होते.

हे देखील वाचा :

Related Articles

Back to top button