राजूमामा मंत्री व्हावे हीच जळगावकरांची इच्छा : घातले साकडे
जळगाव लाईव्ह न्यूज । ३० जून २०२२ । क्षितीज फाउंडेशनच्या वतीने शहरातील इच्छादेवी माता मंदिरात क्षितीज फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मा. गजानन वंजारी यांच्या नेतृत्वात इच्छादेवी मातेला साकडे घालण्यात आले. यावेळी सुरेश (राजुमामा) भोळे यांची राज्यात मंत्रिपदी वर्णी लागवी म्हणून जळगाव शहरातील युवकांनी एकत्र येऊन इच्छादेवी मातेला साकडं घातल
यावेळी गजानन वंजारी यांनी इच्छादेवी मातेची पूजा केली व साकळ घातल.यावेळी बाळू मराठे, भला तडवी, राहुल सोले, तेजस वाघ, चेतन मराठे, विशाल रंधे, धिरज नाईक, गौरव वाघ, जयेश पाटील, अक्षय मेघे, लोकेश वाघ, किरण नाईक, अविनाश पारधे, राहुल अहिरे, मोनू अडकमोल, रविंद्र पवार, राहुल सानप, विजय वाघ, यांनी जळगावचे आमदार सुरेश (राजुमामा) भोळे यांना मंत्रीपद मिळाव म्हणून यावेळी प्रार्थना केली.यावेळी मंदिराचे पुजारी राजु महाराज उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात कोणाकोणाला संधी मिळणार, याविषयी तर्कविर्तक लढविले जात आहेत. शिंदे यांच्यासोबत आधीच्या सरकारमधील नऊ मंत्री आहेत. त्यांना पुन्हा मंत्रिपदे दिली जातील असे म्हटले जाते. माजी मंत्री गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार, जयकुमार रावल, राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रशेखर बावनकुळे, डॉ. संजय कुटे, आशिष शेलार, राजेंद्र पाटणी, माधुरी मिसाळ, संभाजी पाटील – निलंगेकर. याशिवाय, कॅबिनेट मंत्रिपदासाठी डॉ. विजयकुमार गावित, किसन कथोरे, सुरेश खाडे, योगेश सागर, रवींद्र चव्हाण यांच्या नावाचा विचारही केला जात असल्याचे सांगितले जाते. यात आमदार भोळे यांनाही मंत्रिपद मिळो हीच इच्छा व्यक्त केली जात आहे.