आजच्या काळात इलेक्ट्रिक वाहने खूप लोकप्रिय होत आहेत. यामुळे तुमच्या इंधनावरील खर्चात बचत तर होतेच, शिवाय गाडी चालवण्याची वेगळी अनुभूतीही मिळते. दरम्यान, टेस्लाची इलेक्ट्रिक कार मॉडेल Y ही जगातील सर्वाधिक विकली जाणारी कार ठरली आहे. एका अहवालात ही बाब समोर आली आहे.
Jato Dynamics च्या डेटानुसार, Tesla Model Y ने 2023 च्या पहिल्या तिमाहीत Toyota च्या RAV4 आणि Corolla मॉडेलला मागे टाकून जागतिक विक्री क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे. Tesla च्या 2023 मॉडेल Y कारची किंमत $47,490 (सुमारे 39 लाख रुपये) पासून सुरू होते, जी 2023 Corolla ($21,550) आणि RAV4 ($27,575) पेक्षा खूप जास्त आहे.
‘या’ इलेक्ट्रिक स्कूटरच्या किमती 1 जूनपासून वाढणार
267,200 कार विकल्या गेल्या
टेस्ला मॉडेल Y ने या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत जागतिक स्तरावर 267,200 युनिट्सची विक्री केली, तर 256,400 कोरोला आणि 214,700 RAV4 युनिट्स विकल्या गेल्या. टेस्लाचे सीईओ एलोन मस्क यांनी 2016 मध्ये भाकीत केले होते की मॉडेल प्रति वर्ष 500,000 ते 1 दशलक्ष युनिट्सच्या पातळीवर मागणी आकर्षित करेल. 2021 मध्ये, मस्कने भाकीत केले की Y मॉडेल जगातील अव्वल स्थान घेईल.