‘डिस्मेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ विरोधात जळगाव जिल्हाधिकाऱ्यांसह सहा तालुक्यातील प्रशासनाला निवेदने !
जळगाव लाईव्ह न्यूज | ७ सप्टेंबर २०२१ | सुरेश पाटील ‘डिसमॅन्टलिंग ग्लोबल हिंदुत्व’या हिंदुविरोधी कार्यक्रमाचे आयोजन जागतिक स्तरावर करण्यात आले आहे.या विरोधात जगभरातून प्रतिक्रिया येत असून हिंदूंमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष पसरला आहे.हिंदु जनजागृती समितीसह देशभरातील32हून अधिक हिंदुत्वनिष्ट संघटना आणि हिंदु धर्माभिमानी यांचा आंदोलनात सहभाग होता.याविषयी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात तसेच यावल, भुसावळ,पारोळा, धरणगाव आणि एरंडोल तहसील कार्यालयांत आणि फैजपुर प्रांत कार्यालयात निवेदन देण्यात आले. आंदोलनात हिंदुराष्ट्र सेना, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि गोरक्षा सेना यांच्या पदाधिकारी कार्यकर्ते यांचा सहभाग होता. जळगावमधील सुशील अत्रे आणि उद्योजक उमेश सोनार यांनी त्यांच्या बाईट द्वारे या हिंदूविरोधी परिषदेचा निषेध केला.
या कार्यक्रमाला भारतातून कम्युनिस्ट आणि साम्यवादी विचारांचे कट्टर पुरस्कर्ते कविता कृष्णन,आनंद पटवर्धन,नलिनी सुंदर,नेहा दीक्षित,मीना कंदासामी आदी वक्ते संबोधित करणार असल्याचे,तसेच जगभरातील40 हून अधिक विद्यापिठेही सहभागी असल्याचा दावा आयोजकांनी केला होता;मात्र जगभरातील हिंदूंच्या जोरदार विरोधामुळे यातील अनेक विद्यापिठांनी ‘आमचा या कार्यक्रमाशी संबंध नाही’,असे घोषित करून या कार्यक्रमातून माघार घेतली आहे. जागतिक स्तरावर हिंदुद्वेष पसरवण्याचे हे मोठे षड्यंत्र पहाता,या कार्यक्रमाला भारत सरकारने विरोध करावा,तसेच कार्यक्रमात सहभागी भारतीय वक्त्यांवर कारवाई करावी,या मागणीसाठी जगभरातील हिंदूंनी आंदोलन केले.
‘ट्वीटर’वरही ‘डिस्मेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ या कार्यक्रमाला जोरदार विरोध !
या ‘विशेष संवादा’पूर्वी ‘डिस्मेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ या हिंदुविरोधी कार्यक्रमाला ‘ट्वीटर ट्रेंड’वरही मोठ्या प्रमाणात विरोध झाल्याचे दिसून आले.या वेळी अमेरिका,इंग्लंड,जर्मनी,नेदरलँड, कॅनडा,ऑस्टे्रलिया,कतार, इंडोनेशिया,मलेशिया,जपान, श्रीलंका,बांगलादेश,नेपाळ आदी देशांतील हिंदूंनी उत्सफूर्तपणे सहभाग घेतला.या वेळी #DGH_Panelists_Hindu_Haters या ‘हॅशटॅग’चा वापर करून 81हजारांहून अधिक ट्विट करण्यात आले.परिणामी ‘ट्विटर’वर हा हॅशटॅग प्रथम स्थानावर होता.या हिंदुविरोधी कार्यक्रमाला विरोध करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीने Hindujagruti.org या संकेतस्थळावर ‘ऑनलाईन पिटीशन’ ठेवण्यात आली आहे, याद्वारे 2750 हून अधिक लोकांनी इ-मेलच्या माध्यमातून सहभाग घेतला.ही पिटीशन http://HinduJagruti.org/protest-dgh या लिंकवर उपलब्ध असून अधिकाधिक हिंदूंनी यामध्ये सहभाग घेण्याचे आवाहनही समितीने केले असल्याचे दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात हिंदु जनजागृती समिती,जळगाव जिल्हा समन्वयक प्रशांत जुवेकर यांनी नमूद केले आहे.