⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

खान्देशातील ‘हे’ अहिराणी कलाकार देतायेत बॉलीवूडला धोबीपछाड

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जानेवारी २०२३ । सध्याच्या काळात युट्यूब असो वा इन्स्टाग्रामचे रिल्स सर्वच सोशल माध्यमांवर अहिराणी गाण्यांचा बोलबाला पाहायला मिळत आहे. आपल्या अहिराणी गाण्यांनी अनेक बॉलीवूड व मराठी सिने इंडस्ट्रीच्या गाण्यांना धोबी पछाड दिला आहे. यामुळे अशी अहिराणी गाणी तुम्ही ऐकली किव्वा पहिली आहेत का ? जात नसतील तर तुम्ही नक्की हि गाणी पाहायलाच हवीत.

जळगाव, धुळे, नंदूरबार व नाशिक या उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमधील कोणत्याही कानाकोपऱ्यात लग्न असो, त्या लग्नांमध्ये आता हिंदी किंवा मराठी गाण्यांपेक्षा केवळ अहिराणी गाण्यांच वार फिरतांना पाहायला मिळत आहे. गेल्या काही वर्षांपासून हे चित्र वाढत आहे.

सोशल मीडियाचा होतोय फायदा
काही वर्षांपर्यंत काही कलाकार जे स्थानिक कलाकार होते ते गावापुरते किव्वा शहरापुरते मर्यादित होते. मात्र आता सोशल मीडियामुळे प्रत्येक स्थानिक प्रत्येक कलाकाराला आपली कला दाखविण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळाला आहे.यामुळे शेतातून, दुकानातून, घरातून कोणत्याही ठिकाणावरून व्हिडिओ करून तो व्हिडीओ हजारो नागरिकांपर्यंत पोहचतो. आणि कलाकारांना वाव मिळतो. सचिन कुमावत या जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथील एका युवकाने २००५ मध्ये सीडी, डिव्हीडीव्दारे काही अहिराणी गाणे बाजारात आणले. मात्र, गाण्यांची चर्चा झाली, कलाकार मात्र उपेक्षितच राहिला. मात्र, सोशल मीडिया आल्यानंतर सचिन कुमावत या नावाला आात अहिराणी इंडस्ट्रीचा सलमान खान असे म्हटले जात आहे. ‘मुंबई गयी, मी दिल्ली गयी, या गाण्यापासून एरंडोल येथील पुष्पा ठाकूर या ओळखल्या जातात. आज पुष्पा ठाकूर या देखील अहिराणी इंडस्ट्रीच्या आघाडीची नायिका झाली आहे. (sachin kumavat information)

आता या अहिराणी गाण्यांमुळे मोठी उलाढाल होत आहे. हि उलाढाल साधीसुधी नसून कोटींची आहे. बघायला गेलो तर युट्यूबवर मिळणाऱ्या व्ह्यूजमुळे जाहीराती वाढल्या आहेत. त्यातून मोठी रक्कम या कलाकारांनाही आता मिळत आहे.

अहिराणी इंडस्ट्री गाजविणारे कलाकार
१. सचिन कुमावत – रा.शेंदुर्णी, ता.जामनेर (sachin kumavat )
२. पुष्पा ठाकूर – रा.एरंडोल (pushpa thakur)
३. जगदिश संदानशिव – वर्षी, जि.धुळे (jagadish sandanshiv)
४. विनोद कुमावत – पाचोरा, ह.मु.नाशिक (vinod kumavat)
५.श्रावणी मोरे – नाशिक (shravani more)

युट्यूबवर ४० लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज मिळविणारे अहिराणी गाणे
१.केसावर फुगे – २ कोटींपर्यंत व्ह्यूज (kesavar fuge )
२. सावन ना महिना मा – ९८ लाख व्ह्यूज (sawan na mahina)
३.अहो मामी तुमची पोरंगी लय सुंदर – ७१ लाख व्ह्यूज (aho mami tumchi porgi lay sundar)
४. राजा तू तू मना राजा रे – ५० लाख व्ह्यूज (raja tu tu mana raja re )
५. हाई झुमका वाली पोरं – ४४ लाख व्ह्यूज (zumka vali por)