यावल तालुक्यात मंदिरासह ४ ठिकाणी चोरट्यांचा डल्ला

फेब्रुवारी 18, 2022 9:46 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जानेवारी २०२२ । सध्या जिल्ह्यात चोरट्यांनी धुमाकूळ घेतला आहे. शहरासह आता चोरट्यांचा मोर्चा ग्रामीण भागाकडे वळला आहे. यावल तालुक्यातील कासारखेडा गावात अज्ञात चोरट्यांनी चार ठिकाणी घरफोडी केल्याची उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मंदिरासह दुकान व दोन बंद घरांचा समावेश असून चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज लंपास केल्याचे उघड झाले आहे.

gharphodi chori jpg webp

याबाबत असे की, कासारखेडा येथील निंबा पुना कुंभार व सुकलाल मिस्त्री हे कुटुंबासह घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले आहेत. रविवारी सकाळी नागरिकांना त्यांच्या घरांचे दरवाजे उघडे दिसले. पाहणीनंतर त्यांच्या घरात चोरी झाल्याचे समजले. त्याचप्रमाणे गावातील श्री तुकाराम महाराज मंदिरातील दान पेटी देखील फोडलेल्या अवस्थेत दिसून आली. तसेच गावातील मोना इलेक्ट्रॉनिक या दुकानामध्येही चोरी झाल्याचे उघड झाले. त्यामुळे गावात एकाच रात्री चार ठिकाणी चोरी झाल्याची माहिती नागरिकांनी येथील पोलिसांना दिली. यात चोरट्यांनी लाखो रुपयाचा मुद्देमाल लंपास केला आहे.

पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार, सहाय्यक फौजदार अजीज शेख, हवालदार नरेंद्र बागुले, गणेश ढाकणे, संदीप सूर्यवंशी, रोहिल गणेश यांच्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी चाेरी झालेल्या या चारही ठिकाणांची पाहणी केली. मंदिराच्या दानपेटीतून किती रक्कम लांबवली हे मात्र समजू शकले नाही. तर दाेन्ही कुटुंबे घरी परतल्यावर घरातून काय व किती चोरी झाली अाहे, हे स्पष्ट होईल. मात्र, एकाच रात्री गावात चार ठिकाणी चोरी झाल्यामुळे गावामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

हे देखील वाचा:

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now