Amalner : उसने पैसे परत करण्यासाठी बँकेतून रक्कम काढली; पण चोरट्यांनी दांपत्याकडील लाखोंची रोकड हिसकावून काढला पळ

फेब्रुवारी 11, 2025 1:40 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यात एकीकडे चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून घरफोडीच्या घटना प्रचंड वाढल्या आहे. यातच जबरी चोरीच्या घटनाही वाढताना दिसत आहे. अशातच बँकेपासून घरापर्यंत पाठलाग करत दुचाकीस्वार दोघांनी दांपत्याकडून ९ लाख रूपये असलेली पिशवी हिसकावून घेत पळ काढला. ही घटना अमळनेरातील भोईवाडा भागात घडली.

crime chor

उसने पैसे परत करण्यासाठी व काही पैसे जवळ असावे म्हणून ही रक्कम दांपत्याने बँकेतून काढली होती. बँकेपासून घरापर्यंत १५ मिनिटांत पोहचल्यांनतर चोरट्यांनी रक्कम लंपास केली. दरम्यान चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले असून त्याचा शोध सुरु आहे.

पालिकेचे सेवानिवृत्त कर्मचारी बापू शिंगाणे हे त्यांची पत्नी सुरेखा यांच्यासह आयडीबीआय बँकेत सोमवारी दुचाकीने गेले होते. बँकेतून ९ लाख रुपये काढल्यानंतर त्यांनी ते पिशवीत ठेवले. पिशवी जवळ ठेवून ते घराकडे आले. घराजवळ दुचाकी थांबवली असता अचानक काळ्या रंगाच्या दुचाकीवर दोन जण आले. त्यांनी रक्कम असलेली पिशवी हिसकावून घेत कसाली डीपी भागाकडे पळ काढला. काहींनी या चोरट्यांचा पाठलागही केला. मात्र ते पसार झाले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now