⁠ 
शुक्रवार, मे 3, 2024

पोलीस असल्याचं भासवून भामट्यांनी वृद्ध महिलेला लुटले ; जळगावातील प्रकार

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० डिसेंबर २०२३ । एका वयोवृद्ध महिलेला पोलिस असल्याचे भासवून भामट्यांनी हातातील 50 हजार रुपये किंमतीच्या सोन्याच्या बांगड्या लंपास केल्याचा प्रकार जळगाव शहरातील आकाशवाणी ते गोधवाडीवाला अपार्टमेंट या भागात घडला. याप्रकरणी अनोळखी दोघांविरोधात जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान, शहरासह जिल्ह्यात चोरट्यांचा धुमाकूळ सुरू आहे. दिवसेंदिवस घरफोड्या, कुलूत तोडून ऐवज लंपास करण्याचे प्रमाण वाढत आहे.यातच आता भरदिवसा वयोवृद्ध महिलांवर पाळत ठेवून लुबाडण्याचे प्रकार उघडकीस आला आहे.

याबाबत असे की, पुष्पाबाई लालचंद बखतवाणी (75, गणेश नगर, चिनार अपार्टमेंट, जळगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शुक्रवारी दुपारी 12.30 वाजता आकाशवाणी ते गोधवाडीवाला अपार्टमेंट दरम्यान दोन अनोळखी इसम आले व त्याने वयोवृद्धेला बोलण्यात गुंतवत हातातील सोन्याच्या बांगड्या काढण्यास सांगत हातचलाखीने त्यांच्याकडील दोन सोन्याच्या बांगड्या वृद्धेकडे देत धूम ठोकली. काही वेळेने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने वयोवृद्धेने पोलिसात धाव घेतली. तपास महिला हवालदार वंदना राठोड करीत आहेत.