चोरट्यांचा जबर प्लॅन..एक दुचाकी नाही, तब्ब्ल पाच दुचाकी केल्या लंपास
जळगाव लाईव्ह न्यूज । २५ जून २०२२ । जिल्ह्यासह ग्रामीण भागात चोरट्यांचे सूत्र सुरूच आहे. शासनाने चोरट्यांचा आळा घालण्यासाठी अनेक प्रयत्न केले. मात्र, त्याने चोरट्यांना काही ही फरक पडत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. विविध ठिकाणी हुन तब्बल पाच दुचाकी लंपास केल्याची घटना समोर आली आहे. यामुळे पुन्हा एकदा जिल्ह्यासह ग्रामीण भागात खळबळ उडाली आहे. याबाबत वेगवेगळ्या पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पारोळा तालुक्यातील सार्वे येथे वास्तव्यास असलेले वीरेंद्र अशोक पाटील (वय २१) यांची २० हजार किमतीची ( एमएच २० एफइ ४८५३ ) क्रमांकाची दुचाकी कुणी तरी अज्ञात भामट्याने चोरून नेली. याबाबत पाटील यांनी चोपडा शहर पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात भामट्याविरुद्द गुन्हा दाखल झाला आहे. तपास विश्वास देशमुख करत आहे. सचिन दिलीप गुंजाळ (वय ३२ रा.रामवाडी ता. चाळीसगाव) यांची ३५ हजार किमतीची ( एमएच १९ बीझी ९५११) क्रमांकाची दुचाकी कुणी तरी अज्ञात भामट्याने चोरून नेली. याबाबत गुंजाळ यांनी चाळीसगाव शहर पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात भामट्याविरुद्व गुन्हा दाखल झाला. तपास महेंद्र पाटील करत आहे.
एकनाथ लहू लोणे (वय ४० रा.इच्छापूर ता. मुक्ताईनगर ) यांची १५ हजार किमतीची ( एमएच १९ एयू ५६१७) क्रमांकाची दुचाकी कुणी तरी अज्ञात भामट्याने चोरून नेली. याबाबत लोणे यांनी मुक्ताईनगर पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तपास धर्मेंद्र नेम करत आहे. रमेश वाघ ( वय ५० रा. पिंपळगाव ता. पाचोरा ) यांची २० हजार किमतीची ( एमएच १९ सीपी २२५६) क्रमांकाची दुचाकी कुणी तरी अज्ञात भामट्याने चोरून नेली. याबाबत वाघ यांनी पिंपळगाव पोलिसांत अज्ञात भामट्याविरुद्द गुन्हा दाखल झाला आहे. तपास पांडुरंग नेम करत आहे.
रिजवान सौदागर (वय ३२ रा. सोनार गली पाचोरा ) यांची २० हजार किमतीची ( एमएच ०६ बी एन ४३४७) क्रमांकाची दुचाकी कुणी तरी अज्ञात भामट्याने चोरून नेली. याबाबत सौफगर यांनी पाचोरा पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात भामट्याविरुद्द गुन्हा दखल झाला आहे. तपास विश्वास देशकमुख करत आहे.