⁠ 
शनिवार, मे 4, 2024

फैजपूरात चोरट्यांनी ऑटो पार्टसचे दुकान फोडले!

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ जुलै २०२२ । जिल्ह्यासह ग्रामीण भागात सध्या चोरीचे प्रकरण दिवसेंदिवस वाढत असल्याचे वृत्त रोज ऐकायला येतेय. मंगळवारी पुन्हा फैजपूर शहरात नॅशनल ऑटो पार्टसचे दुकान फोडून चोरट्यांनी ६७ हजारांचे साहित्य लांबवल्याचे समोर आले आहे. यामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी फैजपूर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेख इरफान शेख आरीफ (35, मित्तल नगर, फैजपूर) यांनी पोलिसांत तक्रार दिली. हे आपल्या कुटुंबीयांसह येथे वास्तव्यास असून ऑटो पार्टस विक्रीचे काम काम करतात. शेख यांचे फैजपूर ते भुसावळ रोडवर नॅशनल ऑटो पार्ट्स दुकान असून शनिवार, 9 जुलै रोजी रात्री 10 वाजता त्यांनी नेहमीप्रमाणे दुकान बंद केले. त्यानंतर पाऊस सुरू असल्याने त्यांनी दुकान उघडले नाही.

दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांचे बंद असलेले दुकान फोडून दुकानातील दुचाकींचे सीट कव्हर, हॅलोजन राईट, ब्रेक, स्क्रॅप सामान यांच्यासह अधिवस्तूंसह असा एकूण 67 हजार 484 रूपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. मंगळवार, 12 जुलै रोजी नेहमीप्रमाणे ते सकाळी आले असता त्यांना दुकानात चोरी झाल्याचे लक्षात आले.

याबाबत त्यांनी फैजपूर पोलिसांना माहिती दिली. बुधवार, 13 जुलै रोजी सायंकाळी शेख इरफान शेख आरीफ यांच्या फिर्यादीवरून फैजपूर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल अनिल पाटील करीत आहे.