---Advertisement---
गुन्हे जळगाव जिल्हा

Jalgaon : दुकान फोडून तांब्याची चोरी, पोलिसांनी दोघा चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ मे २०२५ । जळगाव शहरासह जिल्ह्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून सातत्याने घरफोडीच्या घटना समोर येत आहे. यातच जळगाव एमआयडीसी पोलिसांनी दुकान फोडून तांब्यांची चोरी करणाऱ्या दोन आरोपींना मुसक्या आवळल्या असून त्यांच्याकडून चोरी केलेला १ लाख ८५ हजार रुपये किमतीचा तांब्याचा मुद्देमाल जप्त केला आहे.

n11

पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या गुन्हे शोध पथकाने ही कारवाई केली. जगवानीनगर गेटसमोर असलेल्या एका दुकानाचे शटर उचकावून आणि चैनल गेट तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला होता. त्यांनी दुकानातून सुमारे ३५० किलो वजनाचे ६५ हजार रुपये किमतीचे जुने तांबे आणि १५० किलो वजनाच्या १ लाख २० हजार रुपये किमतीच्या नवीन तांब्याच्या तारा असा एकूण १ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

---Advertisement---

गुन्हा दाखल झाल्यावर पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी तातडीने गुन्हे शोध पथकाला सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे आणि आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले. पथकातील पोलीस शिपाई राहुल घेटे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, रितेश संतोष आसेरी (वय ४६, रा. रणछोडदास नगर, जळगाव) याला त्याच्या घरातून सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याचा साथीदार रणजीतसिंग जिवनसिंग जुन्नी (वय ३२) याला पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश शिरसाळे, पोलीस नाईक प्रदीप चौधरी, पोलीस कॉन्स्टेबल नितीन ठाकूर, किरण पाटील आणि राकेश बच्छाव यांनी रामानंद नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून पाठलाग करून मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले.

आरोपींनी चोरी केलेला मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने हस्तगत करण्यात आला. सहाय्यक फौजदार विजयसिंग पाटील, रवी नरवाडे आणि अक्रम शेख यांनी या तपासात महत्त्वाची भूमिका बजावली. पोलिसांनी आरोपींकडून ५४ हजार रुपये किमतीचे १०० किलो वजनाचे जुने आणि नवीन तांब्याचे तार जप्त केले आहेत. सध्या या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे आणि पोलीस कॉन्स्टेबल योगेश घुगे करत आहेत.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---

Leave a Comment