जळगाव पोलिसांची मोठी कारवाई: अट्टल दुचाकी चोरास अटक, 15 मोटरसायकली जप्त

फेब्रुवारी 6, 2025 4:42 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ फेब्रुवारी २०२५ । जळगाव शहरासह जिल्ह्यात दुचाकी चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून यामुळे वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अशातच जळगाव एमआयडीसी पोलीसांनी अट्टल दुचाकी चोरट्याच्या मुसक्या आवळल्या आहे. विक्की नंदलाल भालेराव (वय २८, रा. वाघनगर, जळगाव) असं दुचाकी चोरट्याचे नाव असून त्याने जळगाव व धुळे जिल्ह्यातून तब्बल 15 मोटरसायकली चोरल्याचे उघड झाले आहे. याबाबतची माहिती पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी यांनी आज गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

duchakichor

जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीसह इतर भागात दुचाकी चोरीचे प्रमाण वाढल्याने पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधिक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांनी दुचाकीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सुचना देण्यात आले होते. त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाला मिळालेल्या गोपनिय माहितीनुसार दुचाकी चोरी करणारा सराईत गुन्हेगार विक्की नंदलाल भालेराव हा एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत फिरत असल्याचे समजले.

त्यानुसार पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, चंद्रकांत धनके आणि गुन्हे शोध पथकातील कर्मचारी प्रदीप चौधरी, विकास सातदिवे, रतन गिते, राहुल घेटे, योगेश बारी आणि योगेश घुगे यांनी तात्काळ कारवाई करत संशयित आरोपी विक्की भालेराव याला अटक केली. त्याच्याकडून ७ लाख ५० हजार रूपये किंमतीच्या चोरीच्या १५ दुचाकी जप्त करण्यात आले आहे. तसेच चोरट्याकडून दुचाकी चोरीच्या 9 गुन्ह्यांची उकल करण्यास पोलिसांना यश मिळाले आहे. याबाबतचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, प्रदीप चौधरी, विकास सातदिवे आणि रतन गिते हे अधिक तपास करत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now