जळगाव लाईव्ह न्यूज । २७ ऑक्टोबर २०२२ । नवीन घर घेण्यासाठी माहेरहून पैसे न आणल्याने जळगावच्या हरीविठ्ठल नगरातील सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटीतील विवाहितेचा छळ करण्यात आला. या प्रकरणी विवाहितेच्या तक्रारीवरून रामानंदनगर पोलिस ठाण्यात पतीसह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
जळगाव शहरातील हरीविठ्ठल नगरातील सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटीमध्ये गीता दिनेश सोनवणे (28) या पती दिनेश साहेबराव सोनवणे यांच्यासह वास्तव्याला आहे. त्यांचा 2014 मध्ये विवाह झाल्यानंतर पती दिनेश सोनवणे यांनी विवाहितेला नवीन घर घेण्यासाठी माहेरहून पैसे आणावे, अशी मागणी केली मात्र पैसे न आणल्याने विवाहितेला शिविगाळ करणे, मारहाण करणे तसेच जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली तसेच सासरे, सासू आणि दीर यांनी देखील त्यांचा छळ केला. या छळाला कंटाळून विवाहिता माहेरी निघून आल्या.
दरम्यान, बुधवार, 26 ऑक्टोबर रोजी दुपारी 4 वाजता विवाहितेने रामानंदनगर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिल्याने पती दिनेश साहेबराव सोनवणे, सासरे साहेबराव पुंडलिक सोनवणे, सासू प्रतिभा साहेबराव सोनवणे आणि दीर हितेश साहेबराव सोनवणे (सर्व रा. हरी विठ्ठल नगर, जळगाव) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस नाईक सुनील पाटील करीत आहे.