जळगाव जिल्हा

भुसावळ मार्गे धावणाऱ्या आझादहिंद शालीमारसह या रेल्वे गाड्या रद्द, ८ गाड्यांच्या मार्गात बदल

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ जून २०२४ । भुसावळ विभागातील रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. बिलासपूर विभागातील रेल्वेने २४ जूनपासून ब्लॉक घेतला असून यामुळे संत्रागाची – पुणे – संत्रागाची, भुवनेश्वर- एलटीटी- भुवनेश्वर, दोन्ही बाजूची आझादहिंद एक्स्प्रेस, शालीमार एक्स्प्रेस या गाड्या रद्द केल्या आहे. याशिवाय ८ गाड्यांच्या मार्गात बदल केला आहे.

ब्लॉकमुळे मार्ग बदल केलेल्या आणि भुसावळ विभागातून धावणाऱ्या गाड्यांमध्ये अनुक्रमे हावडा – मुंबई गीतांजली एक्स्प्रेस ही गाडी २४ ते २९ जूनपर्यंत झारसुगुडा, टिटलागड, रायपूर मार्गे वळवली जाईल. मुंबई- हावडा गीतांजली एक्स्प्रेस २८ जून ते १ जुलैपर्यंत, हटिया – पुणे एक्स्प्रेस २४ व २८ जून, पुणे – हटिया एक्सप्रेस २६ व ३० जून, पोरबंदर शालीमार एक्स्प्रेस २६ व २७ जून आणि शालिमार-पोरबंदर एक्स्प्रेस २८ व २९ जून असे दोन दिवस झारसुगुडा, टिटलागड, रायपूर मार्गे वळवली जाईल.

रद्द केलेल्या गाड्या अशा
ब्लॉकमुळे रद्द केलेल्या गाड्यांमध्ये संत्रागाची-पुणे एक्स्प्रेस २९ जून, पुणे-संत्रागाची एक्स्प्रेस १ जुलै, भुवनेश्वर – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस २४ व २७ जून, एलटीटी- भुवनेश्वर एक्स्प्रेस २६ त २९ जून, हावडा – पुणे आझादहिंद एक्सप्रेस २७ जून व २ जुलै, पुणे – हावडा आझाद हिंद एक्स्प्रेस २७ जून व २ जुलै, एलटीटी-शालिमार २४ व २९ जून आणि शालीमार-एलटीटी एक्स्प्रेस २६ जून व १ जुलैला रद्द केली आहे

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button